मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात कोसळली दरड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जुलै 2019

खेड - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

खेड - मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात गुरुवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास दरड कोसळली. यामुळे या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

याबाबत मिळालेली माहिती अशी, पोलादपूरच्या हद्दीमध्ये धामणदेवी गावानजीक दगड व मातीचा ढिगारा रस्त्यावर आल्याने वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. दोन तासांच्या प्रयत्ना नंतर एकेरी वाहतूक सुरू करण्यात पोलीस व प्रशासनाला यश आले असले तरी मोठ्या प्रमाणात पुन्हा दरड कोसळण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत कशेडी टॅपवरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस व पोलादपूर येथील पोलीस प्रशासनातील अधिकारी व ग्रामस्थ प्रयत्न करत होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Landslide in Kashedi Ghat on Mumbai - Goa Highway