

First ST bus enters Machal village after 78 years of independence
Sakal
लांजा (रत्नागिरी) : देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ७८ वर्षे उलटली, विज्ञानाने मोठी प्रगती केली; मात्र कोकणातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या एका दुर्गम गावात एसटी बस पोहोचण्यासाठी चक्क स्वातंत्र्याची ७८ वर्षे वाट पाहावी लागली! रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील 'मिनी महाबळेश्वर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य माचाळ या गावात रविवारी (१ नोव्हेंबर) जेव्हा पहिल्यांदा लालपरीने (एसटी बस) प्रवेश केला, तेव्हा संपूर्ण गावात दिवाळीसारखा जल्लोष पाहायला मिळाला.