लांजा नगरपंचायतीसाठी उद्या मतदान 

सकाळवृत्तसेवा
बुधवार, 8 जानेवारी 2020

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्राची एकूण लोकसंख्या 18 हजार 286 इतकी आहे. मतदारसंख्या 13 हजार 239 इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 हजार 697, तर महिला मतदारांची संख्या 6 हजार 542 इतकी आहे.

लांजा ( रत्नागिरी ) - लांजा नगरपंचायतीसाठी गुरुवारी (ता. 9) मतदान होणार आहे. प्रभागनिहाय 17 मतदान केंद्रावर 13 हजार 239 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नगराध्यक्षपदाच्या एका जागेसाठी 5 व नगरसेवकपदाच्या 16 जागांसाठी 58 उमेदवार रिंगणात आहेत. 

हेही वाचा - एसटी प्रवाशांंकडे हे असेल तर पैसेही बाळगण्याची गरज नाही 

लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्राची एकूण लोकसंख्या 18 हजार 286 इतकी आहे. मतदारसंख्या 13 हजार 239 इतकी आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 6 हजार 697, तर महिला मतदारांची संख्या 6 हजार 542 इतकी आहे. प्रभाग क्र. 1 साठी धुंदेरे शाळा, प्रभाग क्र. 2 साठी कुंभारवाडी शाळा, प्रभाग क्र. 3 साठी डाफळेवाडी शाळा, प्रभाग क्र. 4 साठी बौद्धवाडी शाळा, प्रभाग 5 साठी आगरवाडी, प्रभाग क्र. 6 साठी भटवाडी नं. 3, प्रभाग क्र. 7 साठी राणे इंग्लिश स्कूल, प्रभाग 8 साठी लांजा नं. 1, प्रभाग क्र. 9 साठी उर्दू शाळा, प्रभाग क्र. 10 साठी अल अमिन उर्दू हायस्कूल, प्रभाग 11 साठी कनावजे शाळा, प्रभाग 12 साठी न्यू इंग्लिश स्कूल लांजा, प्रभाग 13 साठी लांजा क्र. 5, प्रभाग 14 साठी शासकीय विश्रामगृह, प्रभाग 15 साठी बागेश्री शाळा, प्रभाग 16 साठी कुवे नं. 1, प्रभाग 17 साठी कुवे नं. 2 ही 17 मतदान केंद्रे घोषित करण्यात आली आहेत. 

हेही वाचा - एसटी कामगार म्हणाले, ...तर नियमातच काम करू 

मतमोजणी शुक्रवारी दहा वाजता

याबरोबरच 18 मतदान केंद्रांवर 4 मतदार अधिकाऱ्यांसह एक शिपाई व एक पोलिस असे एकूण 6 कर्मचारी याप्रमाणे 18 मतदान केंद्रांवर 108 कर्मचारी, तीन झोनल ऑफिसर तैनात करण्यात आले आहेत. मतमोजणी शुक्रवारी (ता. 10) सकाळी 10 वाजता सांस्कृतिक भवन येथे होणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण खाडे यांनी दिली.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lanja Nagarpanchayat Election On Thursday Ratnagiri Marathi News

टॅग्स
टॉपिकस