ताडपत्री उडून गेली; स्वागत कक्षातच प्लास्टिकची भांडी ठेवण्याची नामुष्की

भूषण आरोसकर
Monday, 17 August 2020

गळतीचे पाणी कॉंक्रिटच्या छतावरून पडू नये, यासाठी ताडपत्री टाकली होती. मात्र, ही ताडपत्री उडून गेल्याने याठिकाणी गळती होत आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील वनविभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाच्या मुख्य स्वागत कक्षात मुसळधार पावसामुळे गळती लागली आहे. स्वागत कक्षातील छताचे कॉंक्रिटचे काम योग्य पद्धतीने न झाल्याने ही गळती लागली. गळती रोखण्यासाठी ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. 

वाचा - सावंतवाडीला पावसाने झोडपले; तेरेखोल नदीने ओलांडली पुन्हा धोक्याची पातळी

येथील वन विभागाच्या उपवनसंरक्षकाच्या कार्यालयाला पावसात ताडपत्रीचा आधार घ्यावा लागणे ही दुर्दैवाची बाब आहे. स्वागत कक्षात थेंब-थेंब गळणारे पाणी टिपण्यासाठी प्लास्टिकची भांडी लावण्याची नामुष्की ओढवली. 

गळतीचे पाणी कॉंक्रिटच्या छतावरून पडू नये, यासाठी ताडपत्री टाकली होती. मात्र, ही ताडपत्री उडून गेल्याने याठिकाणी गळती होत आहे. उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांची बदली कोल्हापूर येथे झाली. त्यानंतर येथील वन विभागाच्या उपवनसंरक्षकपदाचा कार्यभार एस. डी. नारनवर यांनी स्वीकारला आहे.

हेही वाचा - Good News : आता मध्य रेल्वे धावणार कोकण रेल्वे मार्गावर  

त्यामुळे गळतीची ही समस्या दूर करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांच्याकडून व्यक्त होते. अद्याप दोन ते तीन महिने पावसाची शक्‍यता आहे. तत्पूर्वी, लवकरात लवकर ही समस्या मार्गी लावल्यास स्वागत कक्षावरच प्लास्टिकची भांडी लावण्याची वेळ येणार नाही. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leakage in the forest department office sawantwadi konkan sindhudurg