कोकणात बिबट्याचे हल्ले सुरुच ; ग्रामस्थांत भिती

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 1 November 2020

रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी वरची म्हादये वाडी येथील महादेव म्हादये यांच्या गायीवर आज सायंकाळी बिबट्याने हल्ला केला.

पावस (रत्नागिरी)  : रत्नागिरी तालुक्‍यातील मेर्वी वरची म्हादये वाडी येथील महादेव म्हादये यांच्या गायीवर आज सायंकाळी बिबट्याने हल्ला केला. यात गाय जखमी अवस्थेत सापडल्याने परिसरात पुन्हा एकदा घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या गावात गेल्या दोन महिन्याच्या कालावधीत चार दुचाकीस्वार व एक शेतकरी यांच्यावर बिबट्याने हल्ला करुन जखमी केले. 

हेही वाचा -  टेम्पो- दुचाकीच्या धडकेत एक ठार तर एक जखमी -

त्यानंतर त्याच्यातील एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्यानंतर दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर येथील वरची म्हादये वाडी येथील महादेव म्हादये यांची गाय जंगलात चरण्यासाठी सोडली असता, सायंकाळी जखमी अवस्थेत सापडून आली. यावेळी गायीला उपचारासाठी तातडीने घरी आणण्यात आले. तिच्या अंगावर बिबट्याने मोठ्या प्रमाणात हल्ला केल्याच्या खूणा दिसत होत्या. 

यामुळे या परिसरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पसरले आहे. परिणामी ग्रामस्थांनी जंगलात आपली जनावरे सोडणे धोक्‍याचे बनले आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करणे अत्यावश्‍यक आहे. याबाबत ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.  

हेही वाचा -  कुत्र्यांच्या पाठलागामुळे पाडलोसमध्ये गव्यांच्या हल्ल्यातून शेतकरी बचावला -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attack again on cow in pavas area people fear of leopard

Tags
टॉपिकस
Topic Tags: