रत्नागिरी तालुक्यात बिबट्याची दहशत ; दोन ठिकाणच्या हल्ल्यात दोन वासर ठार

राजेश शेळके
Monday, 16 November 2020

वन विभाग सतर्क झाला असून पाली येथे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

रत्नागिरी : तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. एका दिवसात मिरजोळे आणि पाली येथे बिबट्याने वासरांवर हल्ला केले. या हल्ल्यात दोन वासर ठार झाली. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभाग सतर्क झाला असून पाली येथे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

शहरानजीक असणाऱ्या मिरजोळे पाडावेवाडी येथील विनायक जोगळेकर यांच्या गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. शहरालगत असणाऱ्या गावांमध्ये बिबट्यांचा वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तालुक्यातील पाली गावात बिबट्या थेट भरबाजारपेठेत शिरला. काल मध्यरात्री दीड च्या सुमारास प्रवीण राऊत यांच्या गोठ्यातील पाड्यावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार मारले. 

हेही वाचा - दर्शनासाठी भक्तांची गणपतीपुळ्यात मांदियाळी -

वनपाल गौतम कांबळे, पोलिस पाटील अमेय वेल्हाळ यांनी आज सकाळी या ठिकाणी भेट देऊन पंचनामा केला आहे.
हल्ली बऱ्याच वेळा पाली पंचक्रोशी पाली बाजारपेठ मध्ये बिबट्याचे दर्शन होत असते. पाड्यावर हल्ला करण्याची की बाजारपेठ मधली पहिलीच वेळ आहे. वन विभागाने या भागात ट्रॅप कॅमेरे लावण्यात येणार आहेत. पावस पंचक्रोशीत बिबट्याचा अनेक महिन्यांपासून मुक्त संचार आहे. काही व्यक्तीवर हल्ले केले आहेत. आता बिबटे शहरा लगतच्या गावात येऊ लागल्याने भीती वाढली आहे.

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: leopard attack on calf on this attack calf dead in ratnagiri