esakal | दैव बलवत्तर! काळ आला होता, पण...
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard attack on calf matond konkan sindhudurg

या वासरावर पशु चिकित्सकांमार्फत उपचार सुरू असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले.

दैव बलवत्तर! काळ आला होता, पण...

sakal_logo
By
दीपेश परब

वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) - मातोंड गंडाचेराई (ता. वेंगुर्ले) येथील शेतकरी संदीप बाबली परब यांच्या गाईच्या वासरावर शुक्रवारी (ता.31) सायंकाळी बिबट्याने हल्ला केला. जखमी वासरावर उपचार सूरु आहेत,असी माहिती मठ वनरक्षक सावळा कांबळे यांनी दिली. या प्रकारामुळे येथील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

संदीप परब हे आपल्या गुरांना येथील सड्यावर चरण्यासाठी घेऊन गेले होते. यावेळी इतर गुरे पुढे जाऊन एक वासरू मागे राहिले. त्यामुळे हिच संधी साधून बिबट्याने या वासरावर हल्ला केला; मात्र जीव वाचवून हे वासरू पुढे गेल्याने बिबट्याने इतरांना बघून त्याठिकाणहुन पळ काढला.

या हल्ल्यात वासराच्या पाठीवर, कण्याकडच्या भागाला बिबट्याने चावा घेतल्याने दोन ठिकाणी मोठ्या जखमा झाल्या आहेत, अशी महिती परब यांनी दिली. दरम्यान, याठिकाणी मठ वनरक्षक कांबळे यांनी भेट देऊन जागेचा पंचनामा केला. या वासरावर पशु चिकित्सकांमार्फत उपचार सुरू असल्याचे श्री. कांबळे यांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच मातोंडचे माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य सुभाष सावंत, सामाजिक कार्यकर्ते जगदीश परब, किशोर परब यांनी भेट दिली.

संपादन - राहुल पाटील

loading image