रत्नागिरीत फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका (व्हिडिओ)

राजेश शेळके
गुरुवार, 4 एप्रिल 2019

एक नजर 

  • रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे (लावगणवाडी) येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत अडकला बिबट्या.  
  • स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने त्याला सुखरुप पिंजर्‍यात घेऊन सोडले नैसर्गिक अधिवासात.  
  • नर बिबट्याचे वय तीन वर्ष होते.  उंची 67 सेमी. लांबी 153 सेमी 

रत्नागिरी - तालुक्यातील कोतवडे (लावगणवाडी) येथे डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकला. आज सकाळी हा प्रकार उघड झाला. स्थानिकांच्या मदतीने वनविभागाने त्याला सुखरुप पिंजर्‍यात घेऊन नैसर्गिक अधिवासात सोडले. फासकी कोणी लावली, याचा शोध वनविभाग घेत असून जमिन मालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. 

कोतवडे-लावगणवाडी येथे बिबट्या फासकीत अडकल्याची माहिती उपसरपंचांनी वन विभागाला दिली. याची माहिती वार्‍यासारखी पसरल्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. बिबट्या गर्दी पाहुण अधिकच आक्रमक झाला. अंगावर धाऊन येत होता. त्याला पकडण्यासाठी वन विभागाने आखणी केली. विभागाचे अधिकारी विजयराज सुर्वे, परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी रमेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाली वनपाल एल. भी. गुरव, राजापूरचे वनपालन श्रीमती कीर, लांजा वनपाल पी. जी. पाटील, परमेश्‍वर डोईफोडे, राहुल गुंठे, मिताली कुबल, श्री. गावडे, वी. द. कुंभार, दिनेश चाळके आदींनी बिबट्याला पिंजर्‍यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला.

बिबट्याला एकच पाय फासकीत अडकल्यामुळे तो अंगावर येत होता. सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात तो थकला होता. अखेर वन विभागाने पिंजरा पाठीमागून पुढे-पुढे सरकवत बिबट्याजवळ नेला आणि बिबट्याला पिंजर्‍यात घेतले. या प्रकारामध्ये बिबट्या किरकोळ जखमी झाला होता. परंतु सुरक्षित होता. त्याची तपासणी करून त्याला नैसर्गित अधिवासात सोडले. 

एक नजर 

  • नर बिबट्याचे वय तीन वर्ष होते 
  • उंची 67 सेमी 
  • लांबी 153 सेमी 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard captured in Ratnagiri released in Domicile