वैभववाडी तालुक्यात रेल्वेच्या धडकेत पुन्हा एका बिबट्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 एप्रिल 2019

एक नजर

  • वैभववाडी येथे रेल्वेच्या धडकेमुळे शनिवारी सायकांळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू
  • हा प्रकार कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठलमंदीरानजीक घडला.
  • दोन दिवसांपुर्वी रेल्वेच्या धडकेत मुत्यु झालेल्या बछड्याची ती आई असल्याचे वनविभागाच म्हणणे
  • रात्री उशिरा बिबट्यावर अत्यंसंस्कार 

वैभववाडी - रेल्वेच्या धडकेमुळे शनिवारी सायकांळी आणखी एका बिबट्याचा मृत्यू झाला. हा प्रकार कोकिसरे बांधवाडी येथील विठ्ठलमंदीरानजीक घडला. दोन दिवसांपुर्वी रेल्वेच्या धडकेत मुत्यु झालेल्या बछड्याची ती आई असल्याचे वनविभागाच म्हणणे आहे. दरम्यान, रात्री उशिरा बिबट्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले.

कोकिसरे बांधवाडी येथील काही ग्रामस्थांना शनिवारी दुपारी रेल्वे ट्रॅकपासून दोन किलोमीटर अंतरावर विठ्ठल मंदिरानजिक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. ग्रामस्थांनी ही माहिती वनविभागाला दिली. ही माहिती मिळताच वनक्षेत्रपाल एस. बी. सोनवडेकर, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनरक्षक पी. डी. पाटील, वनमजूर चंद्रकांत मराठे हे घटनास्थळी दाखल झाले. मादी जातीच्या बिबट्याला दुखापत झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. रेल्वेची धडक मादीला बसली असावी असा वनविभागाचा अदांज आहे. त्यामुळेच तिचा मृत्यु झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. बिबट्याचे वय अदांजे पाच वर्षे होते. मृत बिबट्यावर तेथेच अंत्यसंस्कार करण्यात आले. 

कोकिसरे परिसरात एक मादी आणि दोन बछड्यांचा वावर होता. तशा स्वरूपाची माहिती वनविभागाला होती. दरम्यान, त्यापैकी एका बछड्यांचा दोन दिवसांपुर्वी रेल्वेच्या धडकेने मृत्यु झाला होता. दरम्यान, काल मृतावस्थेत आढळलेली मादी ही त्या बछड्यांची आई असल्याचे वनविभागाने स्पष्ट केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard dead in an accident in Vaibhavwadi Taluka