शिकार करताना झाली शिकार ; विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू 

Leopard dies after falling into well
Leopard dies after falling into well

लांजा - भक्ष्याची शिकार करत असताना विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू झाला आहे. लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली बेर्डेवाडी येथील मनोहर भिकाजी साईल यांच्या घरा शेजारी असलेल्या विहिरीमध्ये मादी जातीचा बिबट्याचा मृत्यू झाला. 


याबाबत अधित माहिती अशी, विहीर मालक मनोहर साईल हे दुपारी पाळीव जनावरांना पाणी काढण्यासाठी पंप चालू करण्यास गेले असता त्यांना बिबट्या विहिरीत पडल्याचे दिसून आले.

यावेळी त्यांनी प्रभानवली गावचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांचाल यांना याबाबत माहिती दिली. त्याचबरोबर तत्काळ लांजा वनविभागालाही याची खबर दिली. वनविभागाला खबर मिळताच वनविभाग लांजाचे अधिकारी सागर पताड़े व सहकारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत मृत मादी जातीच्या बिबट्याला बाहेर काढले.


संपादन - धनाजी सुर्वे 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com