Ratnagiri Leopard Dies : फासकीत अडकून बिबट्याचा दुर्दैवी अंत; कमरेला फासकी लागली अन् मोठमोठ्याने धापा टाकत बिबट्या..

Leopard Breathing Struggles Before Death: रत्नागिरी तालुक्यातील फणसवळे येथे फासकी तोडुन फासकीसह आंबा बागेत आलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.
Leopard Dies in Ratnagiri
Leopard Dies in Ratnagiriesakal
Updated on
Summary

पिंजरा व जाळीच्या साह्याने बिबट्याला पिंजऱ्यामध्ये जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच बिबट्या जागेवरच बेशुद्ध झाला. काही वेळातच वेळात बिबट्या मृत झाला.

रत्नागिरी : तालुक्यातील फणसवळे येथे फासकी तोडुन फासकीसह आंबा बागेत आलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. बिबट्या फासकी तोडून बागेत निपचित बसला होता. बागेत फिरणाऱ्या गुरख्याच्या तो निदर्शनास आला.

वन विभागाला (Forest Department) याची माहिती दिल्यानंतर रेक्स्यू करून बिबट्याला पिंजऱ्यात घेतले. परंतु थोड्या वेळातच बिबट्या मृत झाला. फासकी लावणाऱ्या अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून वन विभागाने त्याचा शोध सुरू केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com