संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथे बिबट्या जेरबंद

राजेश शेळके
बुधवार, 31 जुलै 2019

रत्नागिरी - भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देत बिबट्याला जेरबंद केले आहे. 

रत्नागिरी - भक्षाचा पाठलाग करताना बिबट्या चक्क शौचालयात शिरल्याची घटना संगमेश्वर तालुक्यातील देवळे जंगलवाडी येथे घडली आहे. वनविभागाने तातडीने घटनास्थळी भेट देत बिबट्याला जेरबंद केले आहे. 

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सकाळी बिबट्याने अशोक तुकाराम कांबळे यांच्या घराजवळील कुत्र्यावर झडप घातली. मात्र त्यातून हा कुत्रा निसटला आणि पळत थेट अशोक यांच्या शौचालयात घुसला. कुत्र्या पाठोपाठ बिबट्या देखील शौचालयात घुसला. मात्र त्याच वेळी शौचालयाचा दरवाजा बंद झाल्याने कुत्रा व बिबट्या आतमध्ये अडकले. 

अशोक यांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी दरवाज्याच्या फटीतून बिबट्या आणि कुत्रा आतमध्ये असल्याची खात्री केली व तातडीने  वन विभागाशी संपर्क केला. पिंजरा घेऊन वन विभागाचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. प्रथम त्यांनी शौचालयाचा वरील भाग फळ्या ठोकून बंद केला आणि शौचालयाच्या तोंडावर पिंजरा लावून या बिबट्याला जेरबंद केले. वन विभागाच्या माहितीनुसार ही चार वर्षांची मादी आहे. या मादीची वैद्यकीय तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल असे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard found in Devale in Sangmeshwar Taluka