
रत्नागिरीः वाडीत रोज बिबट्या येतो, त्याला तुम्ही पकडून न्या अशा तक्रारी रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावातून वनविभागाकडे येतात. त्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी आम्ही काय करु शकतो, अशी मानसिकता नागरिकांमध्ये तयार व्हावी असा प्रयत्न सह्याद्री संकल्प सोसायटी आणि वन विभागाने संगमेश्वर तालुक्यात रूजवण्यासाठी बिबट्या मित्र उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी बिबट्यांचा सर्वाधिकवावर असलेल्या काही गावांची प्रायोगिक तत्वावर निवड करून बैठकाही घेण्यास सुरूवात केली आहे.