रक्तबंबाळ अवस्थेत महाजन जमिनीवर पडले होते. ते मोठ्याने श्वास घेत होते. त्यांची पत्नी सुप्रिया रडत होती. परिसरातील नागरिक ही घटनास्थळी जमले होते.
चिपळूण : कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला केला. स्वतःच्या बचावादरम्यान शेतकऱ्याने बिबट्याला (Leopard Attacks Farmer) जमिनीवर आपटले आणि टोकदार भाल्याने जखमी केले. झटापटीदरम्यान बिबट्या जागीच ठार झाला. चिपळूण तालुक्यातील मौजे वारेली येथे शनिवारी रात्री साडेअकरा वाजता हा प्रकार घडला.