esakal | सुरवातीला अनेकांनी विश्वास ठेवला नाही ; रस्त्यावर फिरताना झालं दर्शन अन् सरकली पायाखालची जमीन
sakal

बोलून बातमी शोधा

leopard seen in guhagar area also people fear for this news

या परिसरात दोन बछडे आणि आई असे तीनजण असल्याची चर्चा आहे.

सुरवातीला अनेकांनी विश्वास ठेवला नाही ; रस्त्यावर फिरताना झालं दर्शन अन् सरकली पायाखालची जमीन

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गुहागर (रत्नागिरी) : शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात सध्या रात्री व पहाटे बिबटयाचे दर्शन होत आहे. बिबट्याचा वावर वाढल्याने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर बिबट्याचा लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली. 

गुहागर शहरातील साखवी ते वरचापाट परिसरात बिबट्याचा फिरत असल्याची चर्चा गेले आठवडाभर होती. सुरवातीला अनेकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला नाही. मात्र, मंगळवारी रात्री 8.30 चे सुमारास साखवी ते व्याघ्राबरी मंदिर परिसरात बिबटयाला रस्त्यावर फिरताना अनेकांनी पाहिले. पुन्हा रात्री 10.30 च्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. वरचापाट येथील रस्त्यावरुन धावत जाणारा बिबट्या सीसीटीव्ही फुटेजमध्येही कैद झाला. या परिसरात दोन बछडे आणि आई असे तीनजण असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा - कायद्याची जाणीव जागविणारे म्युझियम 

सदर बिबट्या साखवी परिसरातून समुद्र किनाऱ्यावरील नगरपंचायतीच्या कचरा प्रकल्पापर्यंत फिरतो. तो कुत्र्यांच्या मागावर असतो, अशी शंका ग्रामस्थांना येत आहे. 
वस्तुस्थितीची खात्री केल्यानंतर नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी परिसरातील ग्रामस्थांना सावध रहाण्याचे, विनाकारण रात्री बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. तसेच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनाही याबाबतची सूचना दिली. 

रहदारीवरही परिणाम, कुत्र्यांची संख्या झाली कमी


बिबट्याच्या भीतीमुळे या परिसरातील रहदारीवरही परिणाम झाला आहे. पहाटे आणि रात्री साखवी परिसरात शतपावलीसाठी येणाऱ्या मंडळींनी आपली दिशा बदलली आहे. भटक्‍या कुत्र्यांची संख्या कमी झाली आहे. तसेच बिबट्या या परिसरात येत असल्याने अनेक भटक्‍या कुत्र्यांनी बसण्याच्या जागाही बदलल्या आहेत. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image