

leopard attack Pachhapur
esakal
पाली : सुधागड तालुक्यातील पाच्छापूर परिसरात बिबट्याचा वावर आता लोकवस्ती पर्यंत पोहोचल्याने संपूर्ण पंचक्रोशी दहशतीखाली आली आहे. रविवारी (ता. 18) रात्री रस्त्यावर तीन पिल्लांसह मादी बिबट्या दिसल्यानंतर, सोमवारी (ता. 19) रात्री बिबट्याने थेट गावात शिरकाव केल्याची खळबळजनक चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. या घटनेमुळे मंगळवारी (ता. 20) संपूर्ण गाव भीतीच्या छायेत होते.