esakal | शिवसेना पदाधिकाऱ्याच्या थेट अंगणात बिबट्या; 2 कुत्र्यांवर मारली झडप
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या थेट अंगणात बिबट्या; कुत्र्यांवर मारली झडप

शिवसेना पदाधिकाऱ्याच्या थेट अंगणात बिबट्या; कुत्र्यांवर मारली झडप

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) : नाणोस येथील शिवसेनेचे पदाधिकारी व सावंतवाडी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष बाबल ठाकूर यांच्या बंगल्याच्या परिसरात असलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला. हा प्रकार मंगळवारी रात्री 1:36 च्या सुमारास घडला. तो सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. तर एका कुत्र्याला त्याने भक्ष्य केले आहे.

दोन महिन्यापूर्वी गायीच्या वासरावर त्याने हल्ला केला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. नाणोस येथे शिवसेनेचे पदाधिकारी बाबल ठाकूर यांचा बंगला आहे. या बंगल्याच्या समोरील परिसरात मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्या आला होता. हा सर्व प्रकार दर्शनी दिशेने लावलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला.

हेही वाचा: Ratnagir Rain Update: कोळकेवाडीत वीजनिर्मिती बंद; संगमेश्वरात पूर

सकाळी ठाकूर यांना आपल्या 3 कुत्र्यांपैकी एक कुत्रा दिसून न आल्याने त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री बिबट्या आपल्या अंगणात येऊन गेल्याचे त्यांना दिसले. बिबट्या भरवस्तीत फिरत असल्यामुळे भीतीचे वातावरण आहे. सीसीटीव्हीमध्ये असे दिसून येत आहे कि प्रवेशद्वाराच्या दिशेने बिबट्या अत्यंत धिम्या गतीने कुत्र्यांच्या दिशेने चालत आहे व अचानक बंगल्याच्या समोर झोपलेल्या 2 कुत्र्यावर त्याने हल्ला केला. त्यातील एक कुत्रा त्याच्या जबड्यातून पळून जाण्यास यशश्वी झाला असून दुसऱ्या कुत्र्याला मात्र त्याने भक्ष्य करत गेला.

loading image
go to top