मांडवी, कोकणकन्येला एलएचबी कोचेस 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जून 2019

रत्नागिरी - कोकण रेल्वेची स्वमालकीची लाल करड्या रंगाची एलएचबी कोचेसची मांडवी आणि कोकणकन्या एक्‍सप्रेस सोमवारी (ता.10) नियमित सेवेत रूजू होत आहे. नविन रूपात येणाऱ्या या गाडीत प्रवाशांना जास्त सुविधा मिळणार आहेत. 

कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार सोमवारी सकाळी साडे आठ वाजता मडगाव येथून 10104 अप मांडवी एक्‍सप्रेस उद्घाटनाच्या फेरीला निघेल. या उद्घाटनप्रसंगी कोकण रेल्वेचे रत्नागिरी येथील पहिले प्रवासी प्रा. उदय बोडस मडगाव येथे उपस्थित राहणार आहेत.

1996 पासून कोकण रेल्वेवर उद्घाटनाच्या गाडीने प्रवास करण्याची त्यांची ही 21 वी वेळ आहे. रविवारी (ता.9 ) 10103 डाऊन मांडवी एक्‍सप्रेस गोव्यात गेली की त्या गाडीचे डबे सेवेतून बाहेर काढले जातील म्हणून त्या शेवटच्या फेरीने बोडस रत्नागिरी- मडगाव प्रवास करून सोमवारी सकाळी मडगाव- रत्नागिरी मार्गावर उद्घाटनाचा प्रवास करणार आहेत. जास्त प्रवासी क्षमता आणि जास्त सुविधा या मुळे डब्याची लांबी वाढल्याने मांडवी व कोकण कन्या एक्‍सप्रेस ची डब्यांची संख्या 24 वरून 22 पर्यंत कमी झाली आहे.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: LHB coaches in Mandavi Konkankanya express

टॅग्स