मुंबई प्रमाणे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे जगप्रसिद्ध होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray

गोवा राज्याप्रमाणे रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात बिच शॅक आणि होम स्टे बाबत स्वतंत्र पॉलिसी तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

मुंबई प्रमाणे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हे जगप्रसिद्ध होणार

रत्नागिरी - गोवा (Goa) राज्याप्रमाणे रत्नागिरी, (Ratnagiri) सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात बिच शॅक (Beach Shack) आणि होम स्टे (Home Stay) बाबत स्वतंत्र पॉलिसी (Independent Policy) तयार करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. तीन महिन्यात ही पॉलिसी येईल. कोकणात पर्यटन (Tourism) वृद्धीच्यादृष्टीने त्याचा नक्कीच फायदा होईन भुमिपुत्रांना रोजगार (Employment) मिळेल. कोकणातील माणसांनी मुंबई बांधली आहे. आज मुंबई (Mumbai) जगप्रसिद्ध आहे. मुंबई प्रमाणे कोकणातील दोन्ही जिल्हे जगप्रसिद्ध होण्याच्या दृष्टीने पर्यटन विभाग आणि शासनाचा प्रयत्न आहे, असे मत पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केले.

गणपतीपुळे येथे आयोजित नळपाणी योजनेच्या भुमिपूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, राजन साळवी यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. ते म्हणाले, आदित्य ठाकरे म्हणाले की, निवडणुकी पुर्वी आणि त्यानंतर दिलेली वचने पूर्ण करण्याचे काम महाविकास आघाडीमार्फत करत आहोत. कोकणाला आवश्यक असा शाश्‍वत विकास आम्ही विविध कामांच्या माध्यमातून करत आहोत. कोविडमध्येही अनेक कामे हाती घेतली. सिंधुदुर्गतील चिपीचं विमानतळं पुर्ण केले, आता रत्नागिरीच्या विमानतळाला शंभर कोटी दिले आहेत. ते काम लवकरच सुरु करण्यात येईल. विमानतळ आले की समृध्दी येते, पर्यटन, उदयोग वाढते. कोकणाचे मुंबईकरांना प्रचंड आकर्षण असते. येथील लाल माती, निळा समुद्र यासह मिळालेले नैसर्गिक ऐश्‍वर्य कोकणातच आहे. त्याचा उपयोग करुन स्थानिक भुमिकपुत्रांच्या रोजगारासाठी काय करता येईल याकडे आम्ही लक्ष देत आहोत.

पर्यावरण, पर्यटनासाठी दोन जिल्हे महत्त्वाचे आहेत. कोकणात पर्यटनला वाव आहे, त्यामुळे उदयोग कमी आणू शकतो. दोन-तिन प्रकल्प येथे येत आहेत. त्याबाबत दोन मतप्रवाह आहेत. कुणाला प्रकल्पाची भिती वाटते, प्रदुषण वाढीची शक्यता वाटते. तर काहींचा याला पाठींबा आहे.

येथील जिल्हाधिकारी पर्यावरणवादी आहेत, ते नेहमीच पर्यावरणपुरक प्रकल्प कसे राबवता येतील याबाबत संदेश पाठवत असतात. कोकणात जेवढी संधी आहे, तेवढेच धोके आहेत. कुणाच्या मुळावर जाऊन म्हणजेच झाड कापून की झाड वाचून विकास करायचा याबाबत विचार करावा लागेल. पर्यावरण वाचवून विकास करायला पाहीजे. वातावरण बदलामुळे वादळं, पूर येतात, उष्णता वाढते, कधी गारपीट होते. त्यामुळे येथील आंबा, काजू फळ पिके नष्ट होतात. याला जबाबदार आपण सर्वच आहोत. याचा विचार करुन पर्यटनाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्थानिक भुमिपूत्रांना रोजगार देण्यासाठी तिन महिन्यात बीच शॅक पॉलिसी कोकणात आणली जाईल. सीआरझेडचे नकाशे तयार झाले की त्याची अंमलबजावणी केली जाईल.

कोकणात प्रत्येक घरोघरी पर्यटक येतात आणि राहतात. येथील घरांमध्ये राहण्याची मजा वेगळीच आहे. या धर्तीवर ‘होम स्टे’ पॉलिस राज्यात नव्हती. त्यामुळे वीजेचे दर, स्थानिक पातळीवरील कर आकारणी याबाबत आळा घालण्यासाठी आणि स्थानिक भुमिपूत्रांना संधी देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. प्रत्येक घराचे हॉटेल होऊ शकते आणि व्यावसायातून रोजगार मिळू शकता. ही नवीन होम स्टे पॉलिसी लवकरच आणण्यात येणार आहे. मशरुम, द्राक्ष कशी काढायाची हे अनुभवण्यासाठी भारतीय युरोपात जातात. तेच कोकणात करु शकलो तर तेवढीच समृध्दी मिळणार आहे. कोकणी माणसाच्या मेहनतीमुळे ताकदीवर आणि त्यांनी गाळलेल्या घामावर मुंबई बांधली गेली. त्यामुळेच शाश्‍वत विकास झाला, त्याच धर्तीवर रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास करण्यात येणार आहे. सिंधुरत्न योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबविली तर तर राज्याचा विकास होईल असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Like Mumbai Ratnagiri And Sindhudurg Districts Of Konkan Will Be World Famous

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top