esakal | आताही कठोर निर्बंध लावल्यास करायचे काय? असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे. 

बोलून बातमी शोधा

कोकण : लॉकडाउनच्या धास्तीने परप्रांतीयांनी धरली गावची वाट

कोकण : लॉकडाउनच्या धास्तीने परप्रांतीयांनी धरली गावची वाट

sakal_logo
By
स्नेहल कदम

चिपळूण (रत्नागिरी) : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 30 एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. परिणामी अनेक व्यवसाय बंद पडल्यामुळे परप्रांतीय श्रमिकांची धाकधूक वाढली आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे परप्रांतीयांचे मूळ गावी जाताना अतोनात हाल झाले होते. आताही कठोर निर्बंध लावल्यास करायचे काय? असा प्रश्न त्यांना भेडसावतो आहे.

गेल्या वर्षी लागू झालेल्या लॉकडाउनमुळे अनेक परंप्रांतीय गावी गेले होते. त्यामुळे एमआयडीसीतील कारखान्यांमध्ये श्रमिकांची कमतरता भासत होती. पण 'अनलॉक' झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने परप्रांतीय श्रमिकांनी शहराकडे धाव घेतली होती. परंतु फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परप्रांतीय श्रमिकांची लॉकडाउन लागण्याच्या शक्‍यतेने धाकधूक वाढली होती.

गावी गेलेले बरे

एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कठोर निर्बंध लागू झाल्यामुळे परप्रांतीय श्रमिकांना काय करावे? असा प्रश्न पडला आहे. अनेकांनी गावची वाट धरली आहे. दुकानांमध्ये काम करणाऱ्यांचे हातचे काम गेले आहे. त्यामुळे येथे राहण्यापेक्षा गावी गेलेले बरे, म्हणून त्यांनी काढता पाय घेतला आहे तर काहींनी गावी जाण्यापेक्षा येथेच राहून दिवस काढू, असा निर्णय घेतला आहे. परंतु येणाऱ्या काळामध्ये काय परिस्थिती उद्‌भवेल, या भीतीने परप्रांतीय श्रमिक चिंतेत आहेत.

"गतवर्षी लागलेल्या लॉकडाउनमुळे येथे राहून खूप हाल सहन करावे लागले होते. हातचे कामदेखील गेले होते. येथे राहण्यापेक्षा गावी जाऊन चटणी-भाकरीदेखील खाल्ली असती. येथे घरात राहून काय करणार? त्यापेक्षा गावी गेलेले बरे, असे वाटत आहे."

- मनोजपाल चौहान, श्रमिक कामगार