सावधान ; आंबोलीत जाताय ; पोलिसांच्या या कारवाईला जावे लागणार सामोरे...

lockdown impact amboli tourism in kokan
lockdown impact amboli tourism in kokan

सावंतवाडी(सिंधुदुर्ग) :आंबोली येथील पर्यटन स्थळावर बंदोबस्तामध्ये आणखीन वाढ करण्यात आली आहे. कडक अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक, वाहतूक शाखेचे पथक आणि स्थानिक गुन्हा आणि अन्वेषणचे पोलीस कर्मचारीही घाट परिसरात तैनात आहेत. आतापर्यंत जवळपास सहा जणांवर कारवाई करण्यात आली असून उद्यापासून घाट परिसरातील पर्यटन स्थळावर आणखीन कडक अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.


वर्षा पर्यटनाच्या पार्श्‍वभूमीवर कोरोना रोगाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी जिल्ह्यातील पर्यटन स्थळावर पर्यटकांना पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी तातडीने अंमलबजावणी करत पर्यटन स्थळावर पोलीस तैनात करण्याच्या सूचना दिल्या. या पार्श्‍वभूमीवर आंबोली, चौकुळ परिसरातील पर्यटन स्थळावर गेल्या दोन दिवसापासूनच पर्यटकांवर देखरेखेसाठी पोलीस तैनात करण्यात आले होते. पहिल्या दिवशी आंबोली घाटात पर्यटनासाठी दाखल झालेल्या पर्यटकांना पोलिसांना सूचना देऊन परतवले होते; मात्र तरीही काही पर्यटकांनी याकडे दुर्लक्ष करत पर्यटन स्थळावर आपली हजेरी लावली. पोलिसांकडून आंबोली घाटात जवळपास सहा जणांवर नियम तोडल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून कारवाई करण्यात आली आहे. आंबोली धबधबा, कावळेशेत पॉईंट, महादेवगड, हिरण्यकेशी पॉइंट व इतर महत्त्वाच्या पर्यटन स्थळावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

हेहि वाचा :विवाह झाले रद्द ;  दुसरा मुहूर्त शोधण्याची लागली घाई का ते वाचा..... 

आजपासून या बंदोबस्ताची कुमक वाढविण्यात आली आहे. पर्यटन स्थळावर कोणीही आढळल्यास त्याच्यावर साथरोग अधिनियम राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम यानुसार कडक कारवाई करण्यात येत आहे. आज आंबोलीमध्ये पर्यटन स्थळावर मुख्य धबधबा ठिकाणी दंगल नियंत्रण पथक दाखल झाले आहे. दोन दंगल नियंत्रण पथकमध्ये दहा-दहा ते वीस कर्मचारी ठेवण्यात आले आहेत. येथील पोलिस निरीक्षक शशिकांत खोत हे स्वतः सर्व परिस्थितीचा आढावा घेत आहेत.

त्यांच्या सोबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश भोसले, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक सचिन शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासो बाबर, पोलीस उपनिरीक्षक अमित गोते, पोलीस उपनिरीक्षक नितीन नरके आदी अधिकारी चेकपोस्ट तसेच मुख्य धबधबा आणि महत्त्वाच्या पर्यटन स्थळावर भेट देऊन आढावा घेत आहेत. यामध्ये दंगल नियंत्रण पोलिसांच्या पथकाच्या तुकडीसह वाहतूक शाखेचे 10 पोलीस कर्मचारी, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे सात पोलीस कर्मचारी यासह येथील पोलीस ठाण्याचे दहा पोलीस कर्मचारी अशी टीम आंबोली येथे हे सुरक्षतेसाठी तैनात करण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com