कोरोनाचे लढवय्ये ते दोघे ; एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे कुटुंब देता येत नाही चिमुकलीला वेळ....

lockdown impact for family in ratnagiri
lockdown impact for family in ratnagiri

रत्नागिरी :  कोरोनाचं संकट  गडद होत आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत. प्रशासनावरही ताण वाढत आहे. सगळ्यात जास्त कसरत करावी लागतेय, ती आरोग्य आणि पोलीस विभागाला. त्यातही  एकीकडे कर्तव्य आणि दुसरीकडे कुटुंब अशा दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळनाऱ्या महिला अधिकाऱ्यांनी तर कसरत करावी लागतेय. या परिस्थितीत काम करणारे कुटुंब म्हणजे रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात काम करणारे डॉ. संघमित्रा फुले-गावडे आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र गावंडे.


 कान, नाक, घसा तज्ञ असलेल्या डॉ. फुले मॅडम गेली 20 वर्ष शासकीय सेवेत आहेत. सध्या त्या जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ आरोग्य अधिकारी आहेत. तर त्यांचे पती महेंद्र गावडे हेही डॉक्टर. महेंद्र गावडे हे रत्नागिरी तालुका आरोग्य अधिकारी आहेत. हे दोघंही आपलं कर्तव्य बजावण्यासाठी घराबाहेरच असतात. या दाम्पत्याला एक सहा वर्षांची मुलगी आहे. पण आपल्या कामामुळे डॉ. फुले यांना आपल्या विदिशाला जास्त वेळ देता येत नाही. दोघेही घराबाहेर असल्यामुळे विदिशाला दिवसभर केअर टेकरकडे ठेवावं लागतं. त्यात सध्या कोरोना. त्यामुळे सरकारी सेवेत असणाऱ्या डॉक्टरांना खूपच काळजी घ्यावी लागते. त्यामुळे आईबाबा आपल्याला वेळ देत नाहीत ही विदिशाची तक्रार आहे.

विदिशा  होते खूप व्याकूळ तेव्हा
डॉ. संघमित्रा फुले या सध्याच्या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात जोखमीचे काम म्हणजेच रुग्णांचे स्वॅब घेण्याचं काम करतात. खूप काळजीपूर्वक संशयित रुग्णांचे स्वॅब घेण्याचं  काम त्यांना करावं लागते. त्याशिवाय वार्डमध्ये जाणे, पेशंट तपासणे हेही काम त्या करत असतात. त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यानंतर पूर्ण घर निर्जंतुकीकरण करतात. आणि त्यानंतरच केअर टेकरकडून विदिशाला घेऊन येतात. आम्ही आईवडील दोघेही दिवसभर बाहेर असल्याने आम्हाला भेटण्यासाठी विदिशा खूप व्याकूळ होते.  

आम्ही तिला वेळ देत नाही ही तिची नेहमी तक्रार असल्याचं डॉ. संघमित्रा फुले सांगतात. रुग्णांशी प्रत्यक्ष संपर्क येत असल्याने विदिशाला जवळही ठेवणे शक्य नाही. त्यामुळे हा खरंतर तिच्यावर एक आघात असल्याचं डॉ. फुले म्हणतात.हळूहळू ती सर्व हे ऍडजस्ट करत आहे. कोरोना काय आहे हेही तिला कळायला लागलं आहे. त्यामुळे कोरोना कधी जाणार हे सारखं विदिशा विचारत असते. पण आता ती हे सर्व समजून घेत असल्याचं डॉ. फुले यांनी सांगीतलं.

देशासाठी खारीचा वाटा

सध्याच्या परिस्थितीत घरात काम करण्यासाठीही कोणी कामवाली ठेवता येत नाही, त्यामुळे घरची सर्व कामं, रुग्ण सेवा हे सर्व करताना डॉ. संघमित्रा यांना कसरत करावी लागते. त्यात सध्या सुट्टीही घेता येत नाही, अशा सर्व परिस्थितीत एक आई आपलं कर्तव्य बजावत असताना मुलीला मात्र वेळ देता येत नाही, याची खंत डॉ. संघमित्रा यांना आहे. असं असलं तरी दुसरीकडे आपण कोरोनाच्या लढाईत अग्रेसर असणाऱ्या आरोग्य विभागात काम करताना देशासाठी आपणही खारीचा वाटा उचलत असल्याचं समाधान डॉ. संघमित्रा यांच्या चेहऱ्यावर दिसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com