Election Results :  शिवसेनेचे विनायक राऊत आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 23 May 2019

रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत बाराव्या फेरी अखेर ९५६४६ मतांनी आघाडीवर होते. 

बाराव्या फेरीत मतदारसंघनिहाय मिळालेली मते -

चिपळूण - विनायक राऊत ३८५५, निलेश राणे १०६३, 
रत्नागिरी - विनायक राऊत ४५९६ निलेश राणे १६३९
राजपूर - विनायक राऊत ३१११ निलेश राणे १४३५
कणकवली - विनायक राऊत १८८६ निलेश राणे २६४८
कुडाळ - विनायक राऊत ३२९९ निलेश राणे २२६६
सावंतवाडी - विनायक राऊत ४२०२ निलेश राणे १९४४

रत्नागिरी - रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत बाराव्या फेरी अखेर ९५६४६ मतांनी आघाडीवर होते. 

बाराव्या फेरीत मतदारसंघनिहाय मिळालेली मते -

चिपळूण - विनायक राऊत ३८५५, निलेश राणे १०६३, 
रत्नागिरी - विनायक राऊत ४५९६ निलेश राणे १६३९
राजपूर - विनायक राऊत ३१११ निलेश राणे १४३५
कणकवली - विनायक राऊत १८८६ निलेश राणे २६४८
कुडाळ - विनायक राऊत ३२९९ निलेश राणे २२६६
सावंतवाडी - विनायक राऊत ४२०२ निलेश राणे १९४४

एकूण  मते - विनायक राऊत २०९४९ निलेश राणे १०९९५
बाराव्या फेरीत विनायक राऊत एकूण ९९५४ मतांनी आघाडीवर

दुसऱ्या फेरीत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेच्या विनायक राऊत यांना 21881 तर निलेश राणे यांना 11993 मते मिळाली आहेत. विनायक राऊत हे 16924 मतांनी आघाडीवर आहेत. 

दरम्यान पहिल्या फेरीत अंतिम मोजणीनंतर विनायक राऊत हे ७६३१ मतांनी आघाडीवर आहेत.

विधानसभा मतदार संघ निहाय मते अशी -

पहिली फेरी

चिपळूण - विनायक राऊत ३८५६, निलेश राणे १२०१, 
रत्नागिरी - विनायक राऊत २४७३ निलेश राणे १६३२
राजपूर - विनायक राऊत ४११६ निलेश राणे ११०३
कणकवली - विनायक राऊत २१०७ निलेश राणे २९२५
कुडाळ - विनायक राऊत २६१७ निलेश राणे १७७५
सावंतवाडी - विनायक राऊत ३१८० निलेश राणे २०८२

एकूण - विनायक राऊत १८३४९ निलेश राणे १०७१८

सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. एकूण १४ लाख ५४ हजार ५२५ पैकी आठ लाख ९७ हजार २४६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीच्या चौदा टेबलांवर २५ फेऱ्यांची मतमोजणी सुरू आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांच्यातच खरी टक्कर होत आहे. सायंकाळी चारपर्यंत फैसला होईल. दोन्ही उमेदवारांनी मिरवणुकीसह जल्लोषाची तयारी केली आहे. 

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघासाठी २३ एप्रिलला एक हजार ९४२ मतदान केंद्रावर ६१.६९ टक्के मतदान झाले. येथील एफसीआय गोदामामध्ये व्हिव्हिएम मशीन स्ट्राँगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. 

स्वाभिमानकडून नीलेश राणे, काँग्रेसचे नवीनचंद्र भालचंद्र बांदिवडेकर, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉकचे संजय शरद गांगनाईक, अपक्ष विनायक लवू राऊत, अपक्ष पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर, बहुजन मुक्ती पार्टी पक्षाचे भिकूराम काशिराम पालकर, अपक्ष नीलेश भिकाजी भातडे, अपक्ष नारायण दशरथ गवस, बहुजन वंचित आघाडीकडून मारूती उर्फ काका जोशी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राजेश जाधव, बहुजन समाज पार्टीचे किशोर वरक यांचा समावेश आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 election result Ratnagiri Sindhudurg constituency