Loksabha 2019 : मच्छीमारांचा बहिष्कार ही विरोधकांची खेळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 एप्रिल 2019

मालवण - स्वाभिमानच्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. बहिष्कार टाकण्याची ही विरोधकांचीच खेळी आहे. प्रत्यक्षात शिवसेना - भाजपने एलईडी समर्थन केले नाही आणि करणारही नाही. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांमध्ये कितीही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास ते येत्या निवडणुकीत आपण भगव्यासोबतच राहू हे दाखवून देतील, असा विश्‍वास रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे युतीचे उमेदवार विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. 

मालवण दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी शिवसेना तालुका कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, अरुण दुधवडकर, ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर, बबन शिंदे, हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, बाबा मोंडकर, विजय केनवडेकर, जान्हवी सावंत, नितीन वाळके, गणेश कुडाळकर, बाबा आंगणे, बाबा सावंत, श्‍वेता सावंत आदी उपस्थित होते. 

"स्वाभिमान'ने मच्छीमारप्रश्‍नी केलेल्या आरोपांना उत्तर देताना राऊत म्हणाले, "पाच वर्षांच्या काळात लोकोपयोगी प्रकल्प मतदारसंघात राबविले आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे केलेल्या कामाच्या जोरावरच लोकांपर्यंत पोचत आहे. मतदारसंघात झालेल्या कामाचे साक्षीदार जनता असल्याने ते मतदानातून दाखवून देतील. पारंपरिक मच्छीमार शिवसेनेच्याच पाठीशी राहिले आहेत. त्यामुळे विरोधकांनी या मोठ्या व्होटबॅंकेत संभ्रमावस्था निर्माण करण्याचे काम केले आहे. त्यांनी उठविलेली ही राळ आहे. पारंपरिक मच्छीमारांच्या हितासाठीच मी अशासकीय विधेयक मांडले. एलईडीची मासेमारी होता नये अशीच आमची भूमिका राहिली आहे. त्यामुळे या विध्वंसकारी मासेमारीचे आम्ही समर्थन केले नाही आणि भविष्यात कधीही करणार नाही. शिवसेना पक्षप्रमुखांनीही नाणार प्रमाणेच एलईडी मासेमारीही हद्दपार करू. पारंपरिक मच्छीमार हे सुज्ञ व जागरूक आहेत. त्यामुळे विरोधकांकडून कितीही त्यांच्यात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास त्यात त्यांना यश मिळणार नाही.' 

कबड्डीची भाषा करू नये ! 
खासदार राऊत म्हणाले, "तंगड्या तोडणाऱ्यांनी कबड्डीची भाषा करू नये. "स्वाभिमान'च्या दलालांनीच पारंपरिक मच्छीमारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र पारंपरिक मच्छीमार भगव्याच्याच पाठीशी आहेत. एकीकडे पर्ससीनधारकांची दलाली करायची आणि दुसरीकडे पारंपरिक मच्छीमारांबद्दल कळवळा दाखविणाऱ्या "स्वाभिमान'ला मच्छीमार जागा दाखवतील.' 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 MP Vinayak Raut comment