Loksabha 2019 : तीन सुनील तटकरेंसह रायगडमध्ये १६ उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या सुनील तटकरे नावाच्या दोन व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत. गुहागरच्या प्रचार सभेत अनंत गिते यांनी ही आपलीच खेळी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या मतदारसंघातील नामसाधर्म्याचा फटका सुनील तटकरेंना बसणार आहे. 

गुहागर - रायगड लोकसभा मतदारसंघात अपक्ष म्हणून उभे राहिलेल्या सुनील तटकरे नावाच्या दोन व्यक्तींनी आपले अर्ज मागे घेतले नाहीत. गुहागरच्या प्रचार सभेत अनंत गिते यांनी ही आपलीच खेळी असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या मतदारसंघातील नामसाधर्म्याचा फटका सुनील तटकरेंना बसणार आहे. 

रायगड लोकसभा मतदारसंघातील आठ उमेदवारांनी आज आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे १६ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २६ उमेदवारांनी ३९ अर्ज भरले होते. त्यापैकी अनंत पद्मा गीते आणि आदिती सुनील तटकरे यांचे अर्ज बाद झाले. सुनील तटकरे आणि अनंत गीतेंसह अन्य उमेदवारांनी जास्तीचे भरलेले अर्ज आज रद्द केले. विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्रांती सेना), संजय अनंत पाशिलकर (बळीराज पार्टी), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), गायकवाड अनिल बबन (अपक्ष), अशोक दाजी जंगले  (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष), सचिन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी) या ८ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. 

१६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामध्ये अनंत गंगाराम गीते (शिवसेना),  सुनील दत्तात्रय तटकरे (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नथुराम भागूराम हाते (बहुजन मुक्ती पार्टी), सुमन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी), मिलिंद भागूराम साळवी (बहुजन समाज पार्टी), मधुकर महादेव खामकर (अपक्ष), संदीप पांडुरंग पार्टे (बहुजन महा पार्टी), सुनील सखाराम तटकरे (अपक्ष), सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), घाग संजय अर्जुन (अपक्ष), गजेंद्र परशुराम तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), सुनील पांडुरंग तटकरे (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) या उमेदवारांचा सहभाग आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Raigad Lok Sabha Constituency