Loksabha 2019 : राणे विरुद्ध शिवसेना नाट्याचा तिसरा अंक 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 मार्च 2019

देवरूख - कोकणातील मुख्य शिमगोत्सव जवळजवळ आटोपत आले आहेत. त्यामुळे धुळवड संपुष्टात आली तरी राजकीय धुळवडीला जोर चढणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा जंगी सामना रंगणार आहे. राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत अब की बार किसकी हार, अशा उत्सुकतेने रंगणार आहे. 

देवरूख - कोकणातील मुख्य शिमगोत्सव जवळजवळ आटोपत आले आहेत. त्यामुळे धुळवड संपुष्टात आली तरी राजकीय धुळवडीला जोर चढणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात पुन्हा एकदा राणे विरुद्ध शिवसेना असा जंगी सामना रंगणार आहे. राज्यातील सर्वाधिक हाय व्होल्टेज लढत अब की बार किसकी हार, अशा उत्सुकतेने रंगणार आहे. 

पूर्वीच्या राजापूर मतदारसंघातून 1989 ला जनता दलाच्या प्रा. मधू दंडवते यांनी कॉंग्रेसच्या शिवरामराजे भोसले यांचा दणदणीत पराभव केला. त्यानंतर लगेचच दोन वर्षांनी लोकसभेची पुन्हा निवडणूक झाली. त्यात मधू दंडवतेंना पराभवाचा धक्‍का बसला. यावेळी कॉंग्रेसचे मेजर सुधीर सावंत निवडून आले. शिवसेनेने वामनराव महाडिकांच्या रूपाने इथे नशिब आजमावले, ते फिके ठरले.

मात्र, दंडवतेंना अपशकुन करण्यास ते उपयोगी पडले. 1996 ला राज्यात शिवसेनेची भगवी लाट आली. त्याचा फायदा शिवसेनेचे उमेदवार सुरेश प्रभू यांना झाला. प्रभूंनी सुधीर सावंत व मधू दंडवतेंचा पराभव करीत लोकसभेच्या सभागृहात एंट्री केली. त्यानंतर 1998, 1999, 2004 अशा सलग निवडणुकांमध्ये प्रभूच येथून विजयी झाले. 2009 ला राजापूर लोकसभा मतदारसंघाचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ अस्तित्वात आला. पंधराव्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकीत कॉंग्रेसचे डॉ. नीलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा 46 हजार मतांनी पराभव करीत 1991 नंतर या मतदारसंघावर कॉंग्रेसचा झेंडा फडकावला. 

तिसऱ्या लढतीकडे सर्वांचे लक्ष 
16 व्या लोकसभेची निवडणूक 2014 ला झाली. यात राणे विरुद्ध शिवसेनेचे विनायक राऊत असा जंगी सामना रंगला, मात्र राणेंना तब्बल दीड लाखांनी चितपट करीत शिवसेनेने येथे पुन्हा भगवा झेंडा फडकावला. 2009 व 2014 साली या मतदारसंघात रंगलेल्या राणे विरुद्ध शिवसेना सामन्याचा तिसरा अंक राणे विरुध्द यांच्यातील लढतीने यावेळी पाहायला मिळणार आहे. तिसऱ्या लढतीत कोण कुणाचा पराभव करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

भाजपची नाराजी कुणाच्या पथ्थ्यावर 

मागील निवडणुकीत राणेंना पराभूत करताना सेनेला मोदी लाटेचा फायदा झाला होता. यावेळी इकडे ही लाट असली तरी भाजपवाले अद्यापही सेनेवर नाराज आहेत. त्यात कॉंग्रेसचा उमेदवारही तगडा आहे. राष्ट्रवादीची भूमिकाही निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे सेनेला मागीलवेळेसारखी ही लढत सोपी जाण्याची शक्‍यता नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency