Loksabha 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नीलेश राणे सर्वांत श्रीमंत उमेदवार

Loksabha 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नीलेश राणे सर्वांत श्रीमंत उमेदवार

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीतील सर्वांत श्रीमंत उमेदवार महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस नीलेश राणे ठरले आहेत. त्यांनी अर्जामधील प्रतिज्ञापत्रात आपली जंगम आणि स्थावर मालमत्ता १९ कोटी असल्याचे नमूद केले आहे. या खालोखाल शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी जंगम व स्थावर मालमत्ता ३ कोटी १८ लाख दाखविली आहे. त्यानंतर महाआघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांची मालमत्ता १ कोटी ८४ लाख दाखवली आहे. नीलेश राणे यांच्यावर ५ तर विनायक राऊत यांच्यावर ३ गुन्हे दाखल असल्याचेही त्यात नमूद आहे. 

रिंगणात १३ उमेदवार असले तरी मालमत्तेच्या दृष्टीने भक्कम तीनच उमेदवार आहेत. त्यामध्ये नीलेश राणे, विनायक राऊत आणि नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा समावेश आहे. राणेंची एकूण मालमत्ता १९ कोटी आहे. त्यामध्ये जंगम मालमत्ता १२ कोटी ४९ लाख ७४ हजार २७७, स्थावर मालत्ता ६ कोटी ५४ लाख ७० हजार आहे. कर्ज ५ कोटी ८६ लाख ०१ हजार ८६९ इतके असल्याची नोंद आहे. त्यांच्या नावे चार वाहने आहेत. दोन मर्सिडिस आणि दोन टोयाटो गाड्या आहेत. १६५६.१० ग्रॅम (५५,७२,७७७) एवढे सोने आहे. २०१४ मध्ये त्यांची संपत्ती ४४.८९ लाख एवढी नोंदविली होती.  पत्नीच्या नावे ११ हिरे (४,३४,३६८ किंमत), सोने २७०७.६५ ग्रॅम (९१,११,२४२ किंमत) त्या खालोखाल विनायक राऊत यांची ३ कोटी १८ लाख जंगम मालमत्ता, ३१ लाख ८७ हजार २९८ स्थावर मालमत्ता आहे. कर्ज २८ लाख रुपये आहे. एकच स्कार्पिओ गाडी त्यांच्या नावे आहे. २२० ग्रॅम (६,५०,०००) एवढे सोने आहे. त्यांची २०१४ ची संपत्ती २ कोटी १६ लाख एवढी नोंदविण्यात आली होती.  

राऊत यांच्या पत्नीच्या नावे २४० ग्रॅम (१० लाख) सोने आहे. राऊत यांच्यावर ३ गुन्हे दाखल आहेत. नवीनचंद्र बांदिवडेकर यांची एकूण संपत्ती १ कोटी ८४ लाख आहे. त्यापैकी जंगम मालमत्ता १ कोटी ८३ लाख ९२ हजार ५०९ तर स्थावर मालमत्ता २ लाख ३३ हजार ७८ रुपये एवढी आहे. कर्ज ५१ लाख ५६ हजार ४४८ एवढे आहे. त्याच्या नावे टाटा सफारी, हुंडाई अशा दोन गाड्या आहेत. २५ ग्रॅम (५०,०००) सोने आहे. त्यांची २०१४ ची संपत्ती ३० लाख एवढी नोंदविली आहे.  पत्नीच्या नावे २ वाहने टाटा इनोव्हा, हुंडाई आय २०, ४०० ग्रॅम सोने आहे. (८, २०,९३६ किम्मत) बांदिवडेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com