Loksabha 2019 : रत्नागिरी-सिंधुदुर्गात डझनभर उमेदवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीच्या अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, डझनभर उमेदवार रिंगणात आहेत. तीन राष्ट्रीय पक्ष, पाच नोंदणीकृत पक्ष आणि चार अपक्षांचा यात समावेश आहे.

रत्नागिरी - रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठीच्या अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेत एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, डझनभर उमेदवार रिंगणात आहेत. तीन राष्ट्रीय पक्ष, पाच नोंदणीकृत पक्ष आणि चार अपक्षांचा यात समावेश आहे. आजच १२ उमेदवारांना चिन्हवाटप केल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.  

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आजची अंतिम मुदत होती. त्यानुसार अजिंक्‍य धोंडू गावडे या अपक्ष उमेदवाराने निवडणुकीतून माघार घेतली. आता शिवसेना-भाजप युतीकडून खासदार विनायक राऊत, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून नीलेश नारायण राणे, काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीकडून नवीनचंद्र बांदिवडेकर, वंचित बहुजन आघाडीकडून काका जोशी, समाजवादी फॉरवर्ड ब्लॉक पक्षाकडून संजय शरद गांगनाईक, अपक्ष उमेदवार विनायक लवू राऊत, अपक्ष पंढरीनाथ विद्याधर आंबेरकर, बहुजन मुक्ती पार्टीतर्फे भिकुराम काशिराम पालकर, नीलेश भिकाजी भातडे (अपक्ष), नारायण दशरथ गवस (अपक्ष), बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे राजेश जाधव, बहुजन समाज पार्टीचे किशोर वरक हे १२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. 

असे असतील चिन्हे
रिंगणात असलेल्या १२ उमेदवारांपैकी पक्षीय चिन्ह असलेल्या किशोर वरक यांचे चिन्ह हत्ती आहे. नवीनचंद्र बांदिवडेकर यांचे हात, शिवसेनेचे धनुष्यबाण, तर स्वाभिमान पक्षाचे नीलेश राणे यांचे चिन्ह रेफ्रिजरेटर (फ्रीज), भिकुराम पालकर यांचे चिन्ह खाट आहे, मारुती जोशी- शिट्टी, राजेश जाधव- एअरकंडिशन (एसी), ॲड. संजय गांगनाईक- क्रेन, नारायण गवस- फणस, नीलेश भातडे- कपाट, पंढरीनाथ आंबेरकर यांना गॅस सिलिंडर या चिन्हांचे वाटप केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Constituency