Loksabha 2019 : स्वाभिमानची सिंधुदुर्गवर, सेनेची मदार रत्नागिरीवर 

Loksabha 2019 : स्वाभिमानची सिंधुदुर्गवर, सेनेची मदार रत्नागिरीवर 

रत्नागिरी - लोकसभा निवडणुकीचा प्रचार अखेरच्या टप्प्यात पोचला आहे. आमदारांची मोट, तळागाळात पोचलेली शिवसेनेची ताकद त्याला मिळालेली भाजपची जोड यामुळे आजही विनायक राऊत यांचे पारडे जड आहे. परंतु तोडीस तोड गर्दी जमविणाऱ्या सभा स्वाभिमानच्या होत आहेत. संगमेश्‍वरातील सभा हे याचे उदाहरण.

स्वाभिमानची सर्वाधिक मदार सिंधुदुर्गवरतर शिवसेनेची रत्नागिरीतील तीन विधानसभा मतदारसंघावर राहणार आहे. यामध्ये कॉंग्रेसचे आघाडीच्या उमेदवाराला मिळणारा पाठिंबा चित्र बदलवणारा ठरू शकेल. 

वंचित आणि कॉंग्रेस हळूहळू मागे पडले पण त्यांची मते निर्णायक ठरू शकतात. शिवसेना तळागाळात पोचली आहे, पण नीलेश यांचे फ्रीज चिन्ह नवीन असल्याने त्यांच्यापुढे गावागावात पोचण्याचे आव्हान आहे. शिवसेनेला सहापैकी पाच आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीस नगरसेवकांची यंत्रणा दिमतीला आहे. तुलनेत स्वाभिमानला एक आमदार, सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण केलेली स्थानिक स्वराज्य संस्थांमधील फळी हीच तेथील ताकद आहे.

राणेंची सर्व भिस्त सिंधुदुर्गतील मताधिक्‍यावर राहील. त्यात कणकवलीत काय चित्र,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
रत्नागिरी जिल्ह्यात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची फळी मोठी नाही. त्यामुळे शिवसेनेतील नाराज, कॉंग्रेस आघाडीसह भाजपच्या तळागाळातील कार्यकर्त्यांवरच स्वाभिमान अवलंबून आहे. फोडाफोडीचे राजकारण काही अंशी यशस्वी होत आहे.

चिपळूण-संगमेश्‍वर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजपवर मदार आहे. रत्नागिरीत मोठे मताधिक्‍य राऊत यांना मिळेल अस अंदाज आहे. येथील भाजपची तळागाळातील फळी साशंक दिसते. त्याचा फायदा स्वाभिमानकडून उठविला जाण्याची शक्‍यता आहे.

मुस्लिम बहूल भागात मते घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. दुसऱ्या टप्प्यातील त्यांच्या सभांना मिळालेली गर्दी वातावरण निर्मितीला पूरक ठरणार आहे. संगमेश्‍वरातील पावटा मैदानातील सभा लक्ष वेधणारी ठरली घराघरात पत्रके पोचविण्याचा शिवसेनेचा फंडा स्वाभिमानही अवलंबत आहे.राजापूरात कॉंग्रेसला चांगली मते मिळतील नाणार प्रकल्प विरोधी आणि बाजूने असे दोन गट आहेत. त्यातील प्रकल्प विरोधकांचा एक गट राणेंच्या, तर एक राऊतांच्या बाजूने आहे. प्रकल्पाच्या बाजूने असलेल्या गटाकडून उमेदवार रिंगणात आहे.

राजापुरातील कॉंग्रेसची जुनी मते भक्कम असल्याने स्वाभिमानची मदार सेनेतील फुटीरांवरच आहे. अखेरच्या टप्प्यात उध्दव ठाकरेंची देवरुख, कणकवलीत तर मुख्यमंत्र्यांच्या सभेची शक्‍यता आहे. 

संख्यात्मक ताकदीत शिवसेना उजवी 
सहा विधानसभा मतदारासंघांपैकी पाच शिवसेनेकडे,तर स्वाभिमानच्या बाजूला आमदार एक असे चित्र आहे. प्रत्येक आमदारांची ताकद पणाला लागणार असून ती आघाडी मोडीत काढण्याचे आव्हान विरोधकांपुढे राहणार आहे. संख्यात्मक ताकदीत शिवसेना उजवीच दिसते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com