Loksabha 2019 : तेलींच्या निवासस्थानी उद्धव ठाकरेंचे स्नेहभोजन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 एप्रिल 2019

कणकवली - महायुतीच्या प्रचारसभेसाठी आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांच्या निवासस्थानी जाऊन स्नेहभोजन घेतले. यामुळे राजकीय भुवया उंचावल्या. तेलींची ठाकरेंशी झालेली जवळीक ही नव्या समीकरणांची नांदी असावी, अशीही चर्चा यानिमित्ताने रंगली. तर तेली हे विधानसभेची तयारी करत असावेत याबबतही तर्कवितर्क लढवले जात होते. 

कणकवलीत शिवसेनेची बडी मंडळी आल्यावर त्यांचा मुक्‍काम आमदार वैभव नाईक यांच्या निवासस्थानी असतो. यापूर्वीही सिंधुदुर्गात आलेले श्री.ठाकरे नाईक यांच्या निवासस्थानी उतरले होते. यावेळी मात्र त्यांनी भाजपचे प्रदेश चिटणीस राजन तेली यांचे निमंत्रण स्वीकारले. ठाकरेंसोबत केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही तेलींच्या निवासस्थानी स्नेहभोजन घेतले. 

एकेकाळी राणेंचे उजवे हात समजले जाणारे तेली आता भाजपचे प्रदेश चिटणीस आहेत. त्यांनी सन 2014 मध्ये सावंतवाडी मतदारसंघातून पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. एवढेच नव्हे तर द्वितीय क्रमांकाची मते घेण्यातही ते यशस्वी ठरले होते. लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात शिवसेना आणि भाजपची युती झाली. हीच युती विधानसभेतही होण्याची शक्‍यता आहे.

तसे झाल्यास तेलींना सावंतवाडी मतदारसंघ केसरकर यांच्यासाठी सोडावा लागणार आहे. तसेच त्यांनी कणकवली मतदारसंघात निवडणूक लढवली तर त्यांना शिवसेनेची साथ महत्वाची ठरणार आहे. त्यादृष्टीनेच तेलींनी ठाकरेंना आपल्या निवासस्थानी आमंत्रित केले असावे, अशी चर्चा राजकीय क्षेत्रात होती.

दरम्यान, लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान काही दिवसांपूर्वी पालकमंत्री केसरकर यांनी सावंतवाडीतील एका कार्यक्रमात राजन तेली हे विधानसभेत दिसतील, असे विधान केल्याने कणकवली मतदारसंघात तेली महायुतीचे उमेदवार असतील, अशीही चर्चा होती.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Loksabha 2019 Uddhav Thackeray meets Rajan Teli