esakal | विघ्नहर्त्या, कोरोनाचे सावट दूर कर!
sakal

बोलून बातमी शोधा

Kokan

विघ्नहर्त्या, कोरोनाचे सावट दूर कर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रत्नागिरी : पावसाने विश्रांती घेतल्यामुळे थाटामाटात, पारंपरिक वाद्यांच्या गजरात जिल्ह्यात ११४ सार्वजनिक तर १ लाख ६६ हजार ५३९ खासगी श्री गणरायाची प्रतिष्ठापना मंगलमय वातावरणात झाली. दुपारनंतर घराघरांगमध्ये (House) सुखकर्ता दुखहर्ताांचे सूर घुमू लागले होते. कोरोनामुळे निर्माण झालेले निरुत्साही वातावरण गणपतीच्या (Ganpati) आगमनाने प्रफुल्लीत झाले होते. प्रत्येकजणं विघ्नहर्त्याकडे "कोरोनाचे (Corona) सावट दूर कर अशी प्रार्थना करत होते.

गणेशोत्सवासाठी आजपर्यंत एसटी , रेल्वेसह खासगी गाड्यांनी लाखभर चाकरमानी जिल्ह्यात दाखल झाले आहेत. पावसाचे सावट टाळण्यासाठी प्रतिवर्षाप्रमाणे अनेकांनी एक दिवस आधीच गणेशमूर्ती घरापर्यंत आणून ठेवल्या होत्या. तर चित्र जवळच असलेल्या गणेशभक्तांनी शुक्रवारी सकाळपासून श्री गणरायाच्या आगमनाची तयारी सुरु केली होती. रत्नागिरीसह चिपळूण शहरात चित्रशाळा, दुकानांमध्ये मूर्ती आणण्यासाठी भक्त सरसावले होते.

हेही वाचा: ड्रेनेज तुंबल्याने दुकानांमध्ये शिरले पाणी; किरकटवाडीतील व्यावसायिकांचे नुकसान

ग्रामीण भागात पारंपरिक पध्दतीने ढोल-ताशांच्या गजरात डोक्यावर मूर्ती बेऊन भक्तगण गणरायाचे स्वागत करताना दिसले.

loading image
go to top