esakal | लोटेतील 'त्या' कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

लोटेतील 'त्या' कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

लोटेतील 'त्या' कंपनीच्या मालकासह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

खेड : तालुक्‍यातील लोटे औद्योगिक (lote MIDC) वसाहतीत 18 एप्रिलला सकाळी साडेनऊच्या सुमारास श्री समर्थ इंजिनिअर्स या रासायनिक (chemical company) कारखान्यात स्फोट होऊन आग लागली होती. या आगीत सहा जणांचा मृत्यू (6 th people dead) आणि चार जण गंभीर जखमी झाले होते. खेड पोलिस (khed police) ठाण्यात शुक्रवारी (7) कंपनी मालक व अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्‍यातील लोटे औद्योगिक वसाहतीत शुक्रवारी श्री समर्थ इंजिनिअर्स या रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन आग लागली होती. ही दुर्घटना घडून मंगेश बबन जानकर (वय 22, रा. कासई खेड), विलास हरिश्‍चंद्र कदम (36, रा. भेलसई), सचिन विठ्ठल तलवार (22, गुणदे), ओंकार उमेश साळवी (23, खेर्डी), अनंत बबन जानकर (27, कासई), विश्वास नारायण शिंदे (62, लोटेमाळ) यांचा मृत्यू झाला. या घटनेत परवेझ शेख (22, कासई ), रामचंद्र बहुतुले (55, भेलसई), जितेश आखाडे (23, लोटे), विलास खरावते (42, गुणदे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक सुजित गडदे यांनी प्राथमिक तपास करून जीवितहानी होवू शकते याची पूर्णपणे जाणीव असताना अमित प्रकाश जोशी (रा. खेंड, चिपळूण), प्रकाश मारुती जोशी (69, खेंड), मिलिंद शिवराम बापट (53, शिवाजीनगर चिपळूण), प्रदीप कृष्णा पवार (52, लोटे माळ खेड) यांनी कंपनीतील कामगारांकडून अत्यंत जोखमीची डर्टी सौंलवंटचे डिस्टिलेशनची प्रक्रिया जाणीवपूर्वक करून घेतला.

हेही वाचा: कोरोनाला फाईट देण्यासाठी मंत्रीमंडळाची फिल्डिंग टाईट; राज्यातून विषाणू होणार हद्दपार?

ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या प्लॉटच्याजवळच कमी जागेत डर्टी सॉलवंटचे डिस्टिलेशनचे प्रक्रियेसाठी आलेले आणि प्रक्रिया पूर्ण झालेले घातक विषारी रसायनाचा (dangerous chemeical) साठा मोठ्या प्रमाणात होता. त्याने पेट घेतल्याने ही गंभीर दुर्घटना घडून त्यामध्ये 6 कामगारांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 304(2), 338, 224, 285, 34 प्रमाणे खेड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

सुरक्षिततेची साधने न पुरवलि नाहित

या प्रकरणी पोलिसानी केलेल्या तपासात कमी खर्चात उपलब्ध होणाऱ्या व डर्टी सॉलवंटचे डिस्टिलेशनचे प्रक्रियेशी संबंधित शिक्षण न घेतलेल्या कामगारांकडून अतिशय धोकादायक स्थितीमध्ये त्यांना कोणतीही सुरक्षिततेची साधने न पुरवता तसेच आपत्कालीन स्थितीमध्ये बाहेर पडण्यासाठी आपत्कालीन मार्ग उपलब्ध न करता तसेच आग ताबडतोब नियंत्रीत करण्यासाठी आवश्‍यक असलेली उपकरणे न पुरवता कारखाना कंपनी मालकाने चालवल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा: राजधानी आणखी आठवडाभर 'लॉक', मुख्यमंत्र्यांची घोषणा