महापुराने बरबाद झालेल्या 'लोटिस्मासाठी' सामंतांची मोठी घोषणा

uday samant
uday samantuday samant
Summary

सुमारे ५ हजार पुस्तके नष्ट झाली असून वस्तूसंग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू तसेच फर्निचर चिखलाने माखले आहे.

चिपळूण : चिपळूणचे नाव आंतराष्ट्रीय पातळीवर पोहचवणारे येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर उभे करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पन्नास लाख रुपये देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे संचालकांना मोठा आधार मिळाला आहे.

२२ जुलैच्या महापुरात लोटिस्मा पूर्णतः पुराच्या पाण्याखाली गेले आणि वर्षानुवर्षे येथे जपून ठेवलेला साहित्यिक व ऐतिहासिक ठेवा या महापुराने बरबाद केला आहे. सुमारे ५ हजार पुस्तके नष्ट झाली असून वस्तूसंग्रहालयातील ऐतिहासिक वस्तू तसेच फर्निचर चिखलाने माखले आहे. २००५ च्या महापुरानंतर लोटिस्माला बसलेला हा दुसरा तडाखा असल्याने येथील संचालकांसमोर आता मोठा यक्षप्रश्न उभा राहिला आहे.

uday samant
'ऑनलाइन शिक्षण प्रणाली राज्यभर राबवणार' : हसन मुश्रीफ

उदय सामंत यांनी लोटिस्माला पन्नास लाख देण्याची ग्वाही दिली. त्यामुळे संचालकांना मोठा आधार मिळाला आहे. चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर हे चिपळूणचे भूषण म्हणून राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवून आहे. २००५ सालच्या महापुराने लोटिस्माला पहिला तडाखा दिला. हजारो पुस्तके खराब झाली. इमारतीची दुर्दशा झाली. परंतु येथील संचलकांनी अविरत मेहनत घेतली. शक्य तितकी साहित्यिक पुस्तके पुन्हा वापरात आणण्याचे प्रयत्न केले. राज्यभरातून पुन्हा पुस्तके जमा करून बाजूलाच असलेल्या इमारतीत वाचनालय स्थलांतरित करून पुन्हा उभारी दिली तर वाचनालयाच्या इमारतीत वस्तूसंग्रहालय निर्माण करून ऐतिहासिक ठेवा जपण्याचे काम होणार आहे.

महापुराने लोटिस्माला जबरदस्त तडाखा दिला. वस्तूसंग्रहालयातील ऐतिहासिक ठेवा चिखलात रुतला आणि लाखो रुपयांच्या फर्निचरचीही दुर्दशा झाली. महापुरामुळे लोटिस्माचे लाखोंचे नुकसान झाले आहे. पुन्हा हे वैभव उभे करण्यासाठी ४० लाखाहून जास्त रकमेची गरज आहे. त्यासाठी मराठी हास्य कलाकार तसेच लोकप्रतिनिधींनी मदतीचा हात पुढे केला आहे.

uday samant
'आता पुढचा नंबर अनिल परबांच्या रिसॉर्टचा'

"राज्यातून पुस्तकरूपी मदत सुरू झाली आहे. सध्याच्या इमारतीत पहिल्या मजल्यावर वाचनालय तर दुसरा मजल्यावर वस्तूसंग्रहालय अशी रचना प्रस्तावित आहे. त्यासाठी आर्थिक अडचण आहे. कोणत्याही परिस्थितीत हा साहित्यिक व ऐतिहासिक ठेवा आम्ही जपणारच. त्यासाठी प्रयत्नदेखील सुरू आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या अनेकांशी संपर्क सुरू आहेत. पण भविष्यात पर्यायी जागा शोधावीच लागेल."

- प्रकाश देशपांडे, कार्याध्यक्ष, लोटिस्मा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com