या एमआयडीसीतून राज्य सरकारला मिळाले 18 व्हेंटिलेटर...

Lotte Parashuram Industrial A ventilator worth Rs 18 lakhs 18 thousand was given to the district hospital
Lotte Parashuram Industrial A ventilator worth Rs 18 lakhs 18 thousand was given to the district hospital

चिपळूण (रत्नागिरी) : लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील दीपक नोव्हाकेम या कंपनीच्या वतीने जिल्हा रुग्णालयाला 18 लाख 18 हजार रुपयांचा व्हेंटिलेटर देण्यात आला. राज्यात सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत आतापर्यंत लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधून अठरा व्हेंटिलेटर राज्य सरकारकडे देण्यात आले. 


राज्यात नैसर्गिक आपत्ती निर्माण झाल्यानंतर लोटे एमआयडीसीने नेहमीच राज्य सरकारला मदतीचा हात पुढे केला आहे. संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्याने गावातील व रोजंदारीवर काम करणार्‍या कुटूंबाला दोन वेळच्या जेवणाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. गरजू लोकांसाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. कोरोनाच्या लढ्यासाठी अनेक दिग्गज मंडळीकडून 
मदतीचे हात पुढे केले जात आहे. लोटे एमआयडीसीतील उद्योजकही यात मागे नाही. 


कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि उद्योग राज्यमंत्री आदितीताई  तटकरे यांच्या आवाहनानुसार मुख्यमंत्री निधी आणि पंतप्रधान सहाय्यता निधीला कोट्यवधीचा अर्थसाहाय्य देण्यात आला. अनेक कारखानदारांनी स्थानिक पातळीवर गरजूंना अन्नधान्याचे वाटप केले. एमआयडीसीकडून मजुरांच्या निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली. होमकोरंटाईनसाठी कारखानदार आणि एमआयडीसीने आपली जागा उपलब्ध करून दिली.

रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आव्हान केल्यावर दीपक नोव्हा कंपनीचे व्यवस्थापक रामराव गायकवाड यांनी आपल्या वरिष्ठ संचालकांशी चर्चा करून 18 लाख 18 हजार रुपयांचा विशेष सुविधा असलेला आणि आवश्यक त्या सर्व एक्सेसरीजसह अद्ययावत व्हेंटिलेटर जिल्हा प्रशासनाकडे हस्तांतरित केला आहे. खेडचे प्रांताधिकारी अविनाश कुमार सोनवणे यांच्याकडे गायकवाड आणि धोंडीराज सावंत यांनी व्हेंटिलेटर सुपूर्त केला. त्यामुळे लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधून अठरा व्हेंटिलेटर राज्य सरकारकडे देण्यात आले आहेत. 
हेही वाचा- पुणे, मुंबईतील शूटिंग कोल्हापुरात?

लॉकडाऊनच्या काळात अनेक कंपन्या बंद आहेत. जिल्हाधिकार्‍यांनी काही कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी कामगार येत नसल्यामुळे कंपन्या बंद आहेत. तरीही कामगारांना पगार द्यावे लागणार आहे. शासनाचा कर लाईटबील व इतर खर्च अंगावर आहेत. तरीही सामाजिक बांधिलकी म्हणून कारखानदार पुढे येवून सरकारला मदत करत आहेत. हे कौतुकास्पद आहे.

डॉ. प्रशांत पटवर्धन अध्यक्ष लोटे परशुराम उद्योजक संघटना
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com