आता गोव्यातही लव्ह जिहाद ; `येथे` झाला विवाह

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

. कायदेशीर लग्न करण्याची तरुणीची मागणी धुडकावून लावली. दरम्यानच्या काळात संशयित मोहसीन याने पीडितेकडून सुमारे तीन लाख रुपये उकळले होते. 

शिवोली -  देशभर लव्ह जिहादची प्रकरणे वाढत आहेत. आता गोवाही त्याला अपवाद राहिलेला नाही. एक प्रतिष्ठित तरुणीही लव्ह जिहादचा बळी ठरल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला आहे. संबंधित युवतीने हणजूण पोलिस स्थानकात तक्रार केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काटेबायणा-मार्मगोवा येथील मोहसीन अल्लादाद खान, (हाजिराबी रेसिडेन्सी, काटे-बायणा) याने वर्षभरापूर्वी बार्देशातील एका हिंदू तरुणीशी वैदीक पद्धतीने विवाह केला होता. हा विवाह सोहळा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग-तालुक्‍यातील सासोली येथे पार पडला होता, असे तक्रारीत पीडितेने नोंद केले आहे. दरम्यान, गोव्यात असलेल्या विवाह नोंदणी कायद्यानुसार, या लग्न सोहळ्याची नोंदणी हेतुपुरस्सर टाळली होती. मात्र वैदिक पद्धतीच्या लग्नाचा आधार घेत संशयित मोहसीन खान याने तरुणीवर वर्षभर अत्याचार केला. कायदेशीर लग्न करण्याची तरुणीची मागणी धुडकावून लावली. दरम्यानच्या काळात संशयित मोहसीन याने पीडितेकडून सुमारे तीन लाख रुपये उकळले होते. 

कायदेशीर पद्धतीने लग्नाची नोंद करण्याची मागणी धुडकावल्यानंतर संशयित मोहसीनने स्वधर्मीय मुलीशी निकाह (लग्न) करण्याचा घाट घातला होता. याबाबत संशयित मोहसीन कुटुंबीयांकडून निकाहच्या पत्रिकाही छापल्या होत्या. दरम्यान, संशयिताच्या निकाहची माहिती पीडितेला समजताच तिने आक्षेप घेत संशयित मोहसीनला याबाबत विचारणा केली असता त्याने उत्तर देणे टाळले. सरतेशेवटी पीडितेने त्याच्याविरोधात हणजूण पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, तक्रारीची दखल घेत पोलिस निरीक्षक सूरज गावस यांनी संशयित मोहसिन याच्याविरोधात भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांर्गत गुन्हा दाखल करून घेतला असून पुढील तपास जारी आहे.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Love Jihad In Goa Marriage In Sasoli Sindhudurg Marathi News