esakal | काही सुखद.. ओव्हरफ्लो होण्याचा सर्वात पहिला मान `या` धरणाला
sakal

बोलून बातमी शोधा

madkhol Dam overflow konkan sindhudurg

श्री. कविटकर पुढे म्हणाले, 2008 फयान वादळात झालेल्या अतिवृष्टीत माडखोल धरणाचा 800 मीटरचा कालवा वाहून गेला होता. त्यामुळे तब्बल बारा वर्ष धरण्याचा पाण्याचा वापर ओलिताखाली येणाऱ्या गावांना होत नव्हता.

काही सुखद.. ओव्हरफ्लो होण्याचा सर्वात पहिला मान `या` धरणाला

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - जिल्ह्यामध्ये गेले दोन-तीन दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तालुक्‍यातील माडखोल येथील धरण तुडूंब भरल्याने ओव्हरफ्लो होऊन पाणी सांडव्यावरून ओसंडून वाहत आहे. जिल्ह्यातील लघु धरणापैकी सगळ्यात पहिले ओव्हरफ्लो होण्याचा मान या धरणाने मिळविला असून पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी जात जलपुजन केले. याबाबत पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता संतोष कविटकर यांनी माहिती दिली. 

ते म्हणाले, ""जिल्ह्यातील लघु धरणांपैकी माडखोल धरण यावर्षी सगळ्यात पहिल्यांदा ओवरफ्लो झाले आहे. धरणाच्या परिसरातील 23 किलोमीटर पाणलोट क्षेत्र असल्याने या भागात होणारे पर्जन्यवृष्टी लक्षात घेता धरण तुडुंब भरले आहे. सद्यस्थितीत 1.69 दशलक्ष घनमीटर एवढा पाणीसाठा आहे. या दळणवळण जवळपास दोनशे चाळीस एकर क्षेत्र हे ओलिताखाली येत असल्याने यावर्षी शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.'' 

श्री. कविटकर पुढे म्हणाले, 2008 फयान वादळात झालेल्या अतिवृष्टीत माडखोल धरणाचा 800 मीटरचा कालवा वाहून गेला होता. त्यामुळे तब्बल बारा वर्ष धरण्याचा पाण्याचा वापर ओलिताखाली येणाऱ्या गावांना होत नव्हता. वाहून गेलेल्या कालव्याचे काम निधीअभावी रखडले गेले होते. अलीकडेच लॉकडाऊनच्या कालावधीत निधी उपलब्ध कालव्याचे काम पूर्ण होऊन एप्रिल-मे या दोन महिन्यात माडखोल भागातील शेतकऱ्यांना धरणाच्या पाण्यामुळे उन्हाळी शेती घेता आली.

शिवाय धरणाचे पाणी नदीत सोडल्यामुळे नदीच्या किनारी असलेल्या गावांनाही यावर्षी मोठा फायदा झाला.'' जिल्ह्यातील सगळ्यात पहिला तुडुंब भरण्याचा मान माडखोल धरणाने मिळवल्याने नियमाप्रमाणे अधिकारी वर्गाने तेथे जाऊन जलपूजन केले. यावेळी शाखा अभियंता अंकुश भुते उपस्थित होते.  

loading image
go to top