

13 Arrested In Mahad Municipal Election Violence Case
Esakal
महाड, ता. २४ (बातमीदार) : महाड नगरपालिकेत मतदानाच्या दिवशी झालेल्या हाणामारीप्रकरणी विकास गोगावले यांच्या अटकेनंतर दुसऱ्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश उपाध्यक्ष सुशांत जाबरे यांच्यासह अन्य पाच जणही पोलिस ठाण्यामध्ये शरण आले आहेत.
महाड नगरपालिकेसाठी २ डिसेंबरला मतदान सुरू असताना मतदान केंद्राबाहेर मोठा राडा झाला होता. यात शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा तर राष्ट्रवादी काँग्रेस युवक प्रदेश उपाध्यक्ष आमने सामने आले होते.