Mahad Landslide 2005 : २६ जुलै २००५. महाराष्ट्राच्या इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरलेला दिवस. मुसळधार पावसानं रौद्ररुप धारण केलं आणि रायगड (Raigad Disaster) जिल्ह्यातील महाडजवळील जुई गावावर मोठं संकट ओढावलं. डोंगराचा प्रचंड भाग कोसळून क्षणात संपूर्ण गाव गाडून गेलं. १५० हून अधिक लोक चिखलाखाली गाडले गेले, घरं-घरटी पाण्यात वाहून गेली, आणि त्या क्षणी कोकणात मृत्यूचं साम्राज्य पसरलं.