महाड : घनकचरा व्यवस्थापन कागदावरच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

महाड : घनकचरा व्यवस्थापन कागदावरच

महाड : सरकारकडून ग्राम स्वच्छता अभियान सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात हे अभियान सपशेल अपयशी ठरले असून गावाच्या वेशीवर, नदीकिनारी किंवा रस्त्यालगत कचऱ्याचे दिसणारे ढीग हे जिल्ह्यातील स्वच्छतेचा कसा बोजवारा उडाला आहे, हे दर्शवते. पर्यटन वृद्धीसाठी मोठा वाव असलेल्या जिल्ह्यातील हे चित्र संतापजनक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

ग्राम पुरस्कार स्वच्छता अभियानात मिळवण्याच्या स्पर्धेत महाड तालुक्यातील सुमारे १५ ग्रामपंचायतींनी पुरस्कार प्राप्त केले आहेत. यातील काही ग्रामपंचायती राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळवण्यात यशस्वी झाल्या. अशीच परिस्थिती जिल्ह्यात आहे. यामुळे गावाच्या प्रवेशद्वारावर ग्रामस्वच्छता पुरस्कार प्राप्त गाव असा फलक लावलेला आढळतो. मात्र आता त्याच शेजारी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. संपूर्ण राज्यात प्लॅस्टिक बंदी किंवा प्लॅस्टिकचा वापर कमी करण्याबाबत अंमलबजावणी होत असतानाच म्हणू गावात प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे ढीग दिसतात. महामार्गावर करांज असलेल्या ग्रामपंचायती आपल्या गावातील कचरा थेट महामार्गाच्या कडेला टाकत आहेत; तर श्रीमंत म्हणून गणल्या गेलेल्या ग्रामपंचायतीही कचरा व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरल्या.

हेही वाचा: राज्यातील ST कर्मचारी संपावर का आहेत? जाणून घ्या सविस्तर

महाड शहराजवळ लाडवली, करांजखोल, नातेखिंड, बिरवाडी, सव, शिरगाव, नाते, दासगाव, चांभारखिंड,नडगाव, वहूर, केंबुर्ली, गांधारपाले, खरवली. आसनपोई, दादली, किंजळघर आदी गावांतील कचरा नदी आणि महामार्गावर टाकण्यात येतो. औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांकडून अनेक ग्रामपंचायतींनी घंटागाड्या आणि कचराकुंड्या घेतल्या आहेत. त्याचा वापर व्यवस्थित होत नसल्याचे दिसून येते. या ग्रामपंचायतींनी स्वतंत्र कचरा व्यवस्थापनासाठी यंत्रणा उभी केलेली नाही, हे विदारक चित्र आहे. ग्रामीण कचऱ्याची समस्या बिकट होत चालली आहे.

हेही वाचा: पोटनिवडणूकीचे चित्र उद्या स्पष्ट होणार ; २५६ उमेदवारांचे अर्ज वैध

दळणवळण साधने वाढली असल्याने प्लॅस्टिक आणि इतर खाद्य पदार्थांच्या वेष्टणांचा कचरा ग्रामीण भागात पोहोचला. शहरानजीक असणाऱ्या ग्रामपंचायतींमध्ये इमारती व रहिवासी क्षेत्र वाढू लागल्याने या ठिकाणी कचरा विल्हेवाट करणे कठीण झाले आहे. प्रक्रिया याबाबत ग्रामपंचायती उदासीन कचराभूमी, कचरा विल्हेवाट किंवा प्रक्रिया बाबत ग्रामपंचायती उदासीन आहेत.

loading image
go to top