Anganwadi Workers Government Benefits
esakal
ओरोस : राज्यातील अंगणवाडी सेविकांना ७ ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आठ दिवसांची दिवाळी सुटी मंजूर केली असून, शासनाने सेविकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांची भाऊबीज भेट देण्यासही मान्यता दिली (Anganwadi workers eight days Diwali leave) आहे. दिवाळी सुटीच्या कालावधीत अंगणवाडीतील बालके आणि अन्य पात्र लाभार्थ्यांच्या पोषण आहार वाटपात कोणताही खंड पडणार नाही, याची दक्षता घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील शासन निर्णयाची माहिती आज झालेल्या जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत देण्यात आली.