maharastra politics
maharastra politics sakal

Maharashtra Election: राज्यात विधानसभेची रंगीत तालीम सुरु; महाविकास आघाडीविरुद्ध भाजपची टक्कर

Maharashtra Election: महाविकास आघाडीविरुद्ध भाजप लढत शक्य; नोंदणीसाठी रस्सीखेच

Mahashtra Election: कोकण पदवीधर मतदार संघाच्या निडणुकीची सर्व पक्षाकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जूनमध्ये महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशीच लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीसह भाजपने पदवीधर मतदार नोंदणीसाठी कंबर कसली आहे.

कोकण पदवीधर मतदार संघासाठी जून २०२४ मध्ये निवडणूक होणार आहे. यासाठी नोव्हेंबर २०२३ पर्यंत मतदार नोंदणीची मुदत आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदारांनी नोंदणी करावी यासाठी राजकीय पक्ष आणि प्रशासनाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. शिक्षकांसह शासकीय कार्यालयांमध्ये असणाऱ्या पदवीधर कर्मचाऱ्यांचेही अर्ज भरून घेतले जात आहेत.

भाजपाचे निरंजन डावखरे सध्या कोकण विभागाचे प्रतिनिधीत्व करत असले तरी मागील पाच वर्षात मोजक्याच वेळा ते रत्नागिरीत आले. त्यामुळे या पाच वर्षांमध्ये पदवीधरांसाठी त्यांनी काय केले किंवा किती योगदान दिले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या वेळी भाजपाकडून निरंजन डावखरेच्या नावाची चर्चा असली तरी त्यांच्या नावाची अजून घोषणा झालेली नाही.


राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसंदर्भात आमदार डावखरेंना घेऊन रत्नागिरीचा दौरा केला. या वेळी कार्यकर्त्यांना जास्तीत जास्त पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे आवाहन केले. युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनी मतदार संघात फिरण्यास सुरवात केली आहे.

युवासेनेसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून मतदार नोंदणीची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. वरुण सरदेसाई यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासह संपूर्ण मतदार संघात फिरून पदवीधर मतदार संघाचा आढावा घेतला. किशोर जैन यांना ठाकरे गटाकडून पदवीधरचा उमेदवार म्हणून हिरवा कंदील मिळाल्याचे समजते. ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचा उमेदवार अजून निश्चित झाला नसला तरी प्रत्येक पक्ष आपल्या पातळीवर उमेदवार निश्चित करून कामाला लागला आहे.

maharastra politics
Konkan Politics: माझ्या आणि उदय सामंतांच्या भेटी होत असतात; निलेश राणेंचे वक्त्यव्य

ठाणे, मुंबईवर सर्वांचे लक्ष

भाजपप्रमाणेच शिवसेना ठाकरे गटाकडूनही कोकण पदवीधर मतदार संघाची बांधणी केली जात आहे. जास्तीत जास्त पदवीधर मतदार नोंदणी करण्यासाठी शिवसैनिकांना आवाहन केले जात आहे. कोकण पदवीसाठी सर्वाधिक मतदान ठाण्यात होते. त्यामुळे सर्वच पक्षांनी ठाणे, नवी मुंबईवर लक्ष केंद्रीत केले आहे.

maharastra politics
Sakal Podcast : मराठा आंदोलनाविरुद्ध सदावर्तेंची याचिका ते ईडीचा अधिकारीच निघाला लाचखोर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com