Konkan Politics
Konkan Politicssakal

Konkan Politics: माझ्या आणि उदय सामंतांच्या भेटी होत असतात; निलेश राणेंचे वक्त्यव्य

Published on

Konkan Politics: पालकमंत्री उदय सामंतांबरोबरची भेटीचा तुम्ही काहीही अर्थ काढू शकता; पण अशा गाठीभेटी होत असतात. ही भेट राजकीय नव्हती. प्रत्येक भेट ही राजकीय असतेच असे नाही. राजकारण सोडून काही गोष्टी असतात. त्याला राजकारणाचा रंग दिला जातो, अशी प्रतिक्रिया भाजपचे माजी खासदार नीलेश राणे यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या मुंबईतील भेटीवर व्यक्त केली.

Konkan Politics
Konkan Politics : सर्वस्व पणाला लावून भाजपसाठी काम करा; माजी खासदार नीलेश राणेंचं कार्यकर्त्यांना आवाहन

राजकारणातून संन्यास घेण्याची घोषणा मागे घेतल्यानंतर भाजपचे नेते नीलेश राणे हे आज रत्नागिरी दौर्‍यावर आले होते. हातखंबा येथे कार्यकर्त्यांनी राणेंचे स्वागत केले. पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांचे बंधू किरण उर्फ भय्या सामंत यांची राणेंनी भेट घेतल्यानंतर चर्चांना उधाण आले होते. नीलेश राणे हे सामंत यांचे राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी नीलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर पडण्याची घोषणा केली होती.

तेव्हा कार्यकर्त्यांसह राजकीय वर्तुळातून राणेंनी पुन्हा सक्रिय व्हावे यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले. दुसर्‍याच दिवशी राणे यांनी भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर राजकारणात सक्रिय राहण्याचा निर्णय जाहीर केला.

Konkan Politics
Konkan Railway News: कोकण रेल्वेची प्रवासी मालवातुकीसह सर्वच क्षेत्रात सर्वोच्च कामगिरी!

काही दिवसातच मुंबईत राणे यांनी मंत्री सामंत यांची भेट घेतली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून किरण सामंत हे इच्छुक आहेत. या परिस्थितीत राणे यांची भेट नक्की कोणत्या गोष्टीसाठी होती यावरून कार्यकर्त्यामध्ये तर्कवितर्क मांडले जात होते. या भेटीबाबत पत्रकारांशी बोलताना राणे म्हणाले, सामंतांबरोबरची भेटीचा तुम्ही काहीही अर्थ काढू शकता; पण अशा गाठीभेटी होत असतात. ही भेट कुठली राजकीय नव्हती.

या भेटीबाबत तुम्ही चर्चा काय त्या रंगवा. तुम्हाला वाटत असेल ते आमचे वैरी आहेत म्हणून पण राजकारणात तसं नसतं. सध्या पक्षाची आता भूमिका वेगळी आहे. आम्ही महायुतीमध्ये आहोत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातीलही काही लोकांच्या वैयक्तीक भेटी होत असतात त्या राजकीय नसतात. भविष्यात लोकसभा की विधानसभा लढवणार, असे पत्रकारांनी विचारले असता राणे म्हणाले, निवडणूक लढविण्याविषयी पक्षश्रेष्ठी ठरवतात. त्यांचा आदेश येईल त्यानुसार कार्यवाही करणार. याविषयी मनात काय आहे, याला महत्व नसते.

कायदेशीर गोष्टींसाठी वेळ लागणार

जरांगे पाटील यांच्याविषयी बोलताना राणे म्हणाले, सर्वपक्षीय नेत्यांनी जरांगे पाटील यांना वेळ देण्याची मागणी केली आहे. राज्यातील वातावरण बिघडू नये आणि आंदोलनाला गालबोट लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आरक्षण देण्यासाठी कायदेशीर गोष्टी सांभाळणे आवश्यक असून त्याला वेळ लागणार आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

Konkan Politics
Konkan Politics : कोकणात ठाकरे गटाला दणका; संगमेश्वरात सामंतांनी पाडले खिंडार, पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.