

Maharashtra government extends monsoon fishing ban until August 15 to ensure fish stock conservation and fishermen's safety
Sakal
पाली : मासे खाणाऱ्या खवय्यांसाठी एक निराशाजनक तर, निसर्ग आणि मच्छीमारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील पावसाळी मासेमारी बंदीच्या कालावधीत राज्य शासनाने मोठी वाढ केली असून, आता ही बंदी १५ ऑगस्टपर्यंत लागू राहणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही महत्त्वपूर्ण घोषणा केली.