Maharashtra Shiv Sena NCP political controversy
esakal
रत्नागिरी : प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. परंतु महायुतीमध्ये असताना एकमेकांवर टीका करताना भान राखले पाहिजे. त्यामुळे पक्ष प्रवेश सोहळ्यात आमदार महेंद्र दळवी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर केलेल्या टीकेबाबत उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यानुसार दळवी यांनी केलेल्या वक्तव्याशी शिवसेना पक्षाचा संबंध नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट (Mahendra Dalvi Sunil Tatkare controversy) केले.