Operation Tiger : महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप? उदय सामंतांच्या 'या' वक्तव्याने मविआची धाकधूक वाढली, अनेक बडे नेते थेट एकनाथ शिंदेंच्या संपर्कात!

Uday Samant Claims Operation Tiger Will Continue : उद्योगमंत्री उदय सामंत यांनी 'ऑपरेशन टायगर' सुरूच राहणार असल्याचा दावा केला. अनेक माजी आणि विद्यमान आमदार शिंदे गटात येण्यास इच्छुक असून महाराष्ट्रात आणखी मोठ्या राजकीय घडामोडी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Uday Samant Operation Tiger latest news

Uday Samant Operation Tiger latest news

esakal

Updated on

रत्नागिरी : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षात होणारे प्रवेश ही एक निरंतर प्रक्रिया आहे. आमचे राजकीय ’ऑपरेशन टायगर’ अजिबात थांबणार नाही. अनेक माजी आमदार, खासदार आणि नगरसेवक सोबत येण्यास उत्सुक आहेतच; पण महाविकास आघाडीतील काही विद्यमान आमदारही सोबत येण्यास तयार (Eknath Shinde Shiv Sena joining news) आहेत. आगामी काळात राज्यात अजून अनेक मोठी ‘ऑपरेशन’ आणि ‘राजकीय भूकंप’ व्हायचे बाकी आहेत, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी येथे केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com