

Seasonal Migration Begins as Shepherds Reach Raigad
Sakal
पाली : चारा पाण्यासाठी राज्यातील अनेक मेंढपाळ घाटमाथ्यावरील रायगड जिल्ह्यात दरवर्षी दाखल होतात. नुकतीच दिवाळी गेली आणि परतीचा लांबलेला पाऊसही संपला असल्याने मेंढपाळ कुटुंबकबिल्यासह रायगड जिल्ह्यात दाखल होत आहेत. घोडे किंवा खच्चरावर आपला लवाजमा, राखणदार कुत्रा व मेंढ्या घेऊन कुटुंब कबिल्यासोबत शेकडो किलोमीटरची पायपीट करत ही मेंढपाळ रायगड जिल्ह्यात दाखल होतात. अक्षरशः हालअपेष्टा सहन करून थंडी वाऱ्यात व कडक उन्हात उघड्यावर संसार थाटततात. रायगड जिल्ह्यात पावसाळी भातशेती केली जाते. पावसाळ्यानंतर काही शेतकरी कडधान्य पिके घेतात.