esakal | कोकणात जल्लोष; रत्नागिरी,सिंधुदुर्गमध्ये यंदाही पोरांनी मारली बाजी
sakal

बोलून बातमी शोधा

SSC Result

SSC Result 2021: कोकणची पोर हुशारच; यंदाही मारली बाजी

sakal_logo
By
- मकरंद पटवर्धन

रत्नागिरी : दहावीच्या निकालात कोकणने महाराष्ट्रात नेहमीप्रमाणे अव्वल स्थान पटकावले आहे. यंदा सर्वाधिक म्हणजे १०० टक्के निकाल लागला असून रत्नागिरी जिल्ह्यातील २१०८० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १००८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. आज दुपारी १ वाजता हा निकाल कोकण मंडळाने जाहीर केला असून कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात विद्यार्थ्यांच्या या निकालाने आनंदमयी वातावरण निर्माण झाले आहे.सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यामुळे या विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

कोरोनामुळे यंदा सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण न करता मूल्यमापनासाठी फॉर्म्युला ठरवण्यात आला. त्यानुसार आज निकाल जाहीर केल्याची माहिती कोकण मंडळाने दिली. मार्च २०२० मध्ये कोकणचा निकाल ९८.७७ टक्के लागला होता व यंदा सर्वाधिक १०० टक्के लागला आहे. यंदा प्रथमच दहावीच्या निकालात अंतर्गत मूल्यमापनासाठी ग्राह्य धरलेल्या प्रथम सत्र, परीक्षा, अन्य मूल्यमापन व परीक्षांच्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना दाखवल्या किंवा घरी दिल्या जात असल्याने गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती मिळणे, पुनर्मूल्यांकन या सुविधा या परीक्षेसाठी कोणत्याही स्तरावर उपलब्ध नाहीत.

दहावीच्या परीक्षेसाठी श्रेणीसुधार योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आलेला नाही. या विद्यार्थ्यांसाठी असलेल्या दोन संधीमध्ये या परीक्षेची गणना करण्यात येणार नसल्याने पुढील एक-दोन संधी उपलब्ध राहतील.

रत्नागिरी विद्यार्थी २१०८०

सिंधुदुर्ग विद्यार्थी १००८८

एकूण विद्यार्थी ३११६८

एकूण मुले १६०३८

एकूण मुली १५१३०

पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी

रत्नागिरी नोंदणी ७२६, उत्तीर्ण ६६८, टक्केवारी ९२.१३

सिंधुदुर्ग नोंदणी २७३, उत्तीर्ण २३३ टक्केवारी ८५.९७

एकूण विद्यार्थी ९९९, उत्तीर्ण ९०१, टक्केवारी ९०.४६

राज्यातील विभागीय मंडळांचा निकाल

कोकण १०० टक्के

पुणे ९९.९६ टक्के

नागपूर ९९.८४ टक्के

औरंगाबाद ९९.९६ टक्के

मुंबई ९९.९६ टक्के

कोल्हापूर ९९.९२ टक्के

अमरावती ९९.९८ टक्के

नाशिक ९९.९६ टक्के

लातूर ९९.९६ टक्के

loading image