श्रीवर्धन: जमीन मिळकतीचा फेरफार नोंद मंजुरी आदेश करून देण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना श्रीवर्धन येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी आणि शिपायाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. .सहाय्यक महसूल अधिकारी नितीन सदाशिव पवार (वय ४२, कुल वहिवाट शाखा) आणि शिपाई सचिन रमाकांत पाटील (वय ४८) यांना अटक करण्याता आली आहे.तक्रारदाराच्या जावयाची म्हसळा तालुक्यातील मौजे देवघर येथे जमीनीची फेरफार नोंद मंजुरी आदेश देण्यासाठी पवार याने ४० हजार रुपयांच्या लाच मागितली होती. याप्रकरणी रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती..Bajari Bhakri: पिझ्झा-बर्गरला टक्कर देणारी ललितपूरची बाजरीची भाकरी! गावातील महिलांच्या हातची भाकरी आता मॉलमध्ये विकली जाणार.त्यानंतर बुधवारी (ता. १७) ३० हजार रुपये लाच घेताना सचिन पाटील यांना पकडल्यानंतर नितीन पवार यालाही अटक करण्यात आले. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का त्याचाही पोलिस तपास करत असल्याचे सांगण्यात आले..Nagpur: ‘सीएलबीपी सिस्टम’चे जाळे देशभरात; प्रत्येक शहरात एजंटची नियुक्ती; ‘मर्चंट कॉइन’च्या नावाने फसवणुकीचे प्रकरण.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे आवाहनकोणत्याही शासकीय कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.