रत्नागिरी : महायुती सरकार राज्यात दमदार कामगिरीच्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. तसेच महायुती किती अभेद्य आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे; परंतु रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीचे संबंध ताणताना दिसत आहेत. भाजपचे नेते आणि मत्स्य व्यवसाय मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) यांनी सिंधुदुर्ग आणि दापोलीत येऊन स्वबळ आणि शतप्रतिशत भाजपचा नारा देत स्थानिक लोकप्रतिनिधींना डिवचले.