esakal | विनाशकारी ‘नाणार’ नकोच: विदर्भ, मराठवाड्यात घेऊन जावा ;महेंद्र नाटेकर
sakal

बोलून बातमी शोधा

nanar project ratnagiri ad shashikant sutar

'विनाशकारी ‘नाणार’ नकोच; विदर्भ, मराठवाड्यात घेऊन जावा'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कणकवली (सिंधुदुर्ग) : नाणार येथे प्रकल्‍प (nanar project) होत नसेल तर तो आमच्या गावात, तालुक्‍यात आणा, अशा मागण्या कोकणातील काही ग्रामपंचायती, लोकप्रतिनिधी करत आहेत. त्‍यांची ही मागणी अज्ञानमूलक आहे. कोकणात कुठेही रिफायनरी प्रकल्‍प झाला तरी त्‍याचे घातक परिणाम संपूर्ण कोकणावर होणार आहेत. त्‍यामुळे कोकणात कुठेच हा प्रकल्‍प होऊ नये. विदर्भ किंवा मराठवाड्यात हा प्रकल्‍प खुशाल घेऊन जावा, असे प्रतिपादन प्रा. महेंद्र नाटेकर( mahendra natekar) यांनी केले. स्वतंत्र कोकणची बैठक येथील सांस्कृतिक भवनमध्ये घेण्यात आली होती, त्यावेळी प्रा. नाटेकर बोलत होते. यावेळी मोतिराम गोठिवरेकर,ए.वाय.चिलवान, वाय्. जी. राणे, जे.जे.दळवी प्राचार्य धनसे इत्यादी मास्क लावून व सामाजिक अंतर ठेवून उपस्थित होते.(mahendra-natekar-speech-on-nanar-project-sindhudurg-kokan-news-akb84)

प्रा. नाटेकर पुढे म्हणाले, `आखाती देशातून सुमारे सहाशे मेट्रिक टन कच्चे तेल आयात करुन त्याच्यावर प्रक्रिया करुन त्यातून पेट्रोल, डिझेल, विमानाचे इंधन तयार केले जाईल.वार्षिक सहा कोटी टनाची जगातील ही सर्वांत मोठी रिफायनरी असेल. या प्रकल्पासाठी औष्णिक ऊर्जा प्रकल्प उभारुन दररोज अठरा हजार टन कोळसा जाळून तेल शुद्धीकरण केले जाईल. त्यातून सहाशे टन राख निर्माण होऊन ती सर्वत्र पसरुन प्रचंड प्रदूषण वाढणार आहे. ह्या रिफायनरीतून दर वर्षी कोट्यवधी मेट्रिक कार्बनडायऑक्साईड व नायट्रोजन ऑक्साईड बाहेर पडून ते संपूर्ण कोकण व्यापून टाकतील.`

हेही वाचा- सिंधुदुर्गात पावसाचा कहर सुरूच; बांदा आळवाडीत पाणी, माणगाव खोऱ्याशी संपर्क तुटला

..मग कोकणात का नको?

ते म्‍हणाले, ``कोकणातील तरुणांना शासकीय कार्यालयांमध्ये पाच टक्‍केही नोकऱ्या मिळत नाहीत. त्‍यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्‍पातून कोकणवासीयांसाठी लाखो रोजगार संधी निर्माण होतील ही भुलथाप आहे. तसेच कोकणामध्ये रिफायनरी प्रकल्प होत नसेल तर आम्ही तो विदर्भ, मराठवाड्यात नेतो अशा धमक्या विरोधी पक्ष देत आहेत. हा केवळ दिखावा आहे. विदर्भात प्रकल्प नेत आहेत मग तो चांगला आहे असे असल्यानेच नेत आहेत मग कोकणात का नको? विरोधकांची ही राजकीय खेळी आहे. ‘रिफायनरी’ झाला तर कोकणातील पर्यटनक्षेत्र तसेच फळ बागायती उद्ध्वस्त होईल. औष्णिक प्रकल्पामुळे गरम झालेले २५ हजार लिटर पाणी समुद्रात सोडल्यामुळे मासे मरतील. मच्छीमारांना जिणे मुश्किल होईल.’’

loading image